Download App

‘लोकसभेला कमी जागा घेतल्या पण, विधानसभेला जमणार नाही’; शरद पवारांचा मित्रपक्षांना इशारा

लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असतानाही कमी जागा घेतल्या पण विधानसभेला मात्र कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी गुरुवारी दिला.

Sharad Pawar : राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान झालं आहे. आता ४ जून रोजीच्या निकालाची प्रतिक्षा आहे. निवडणुकीत मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला याचं उत्तर त्या दिवशी मिळणार. या निवडणुकीनंतर आता राज्यातील राजकारणी मंडळींना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यात शरद पवारांनी आघाडी घेतली असून आपल्या मित्रपक्षांनाच इशारा दिला आहे. लोकसभेला जास्त जागा निवडून आणण्याची ताकद असतानाही कमी जागा घेतल्या पण विधानसभेला मात्र कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी गुरुवारी दिला.

Devendra Fadnavis On Sharad Pawar: मोदीजी शरद पवारांसाठी धोका, देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी तिन्ही पक्षांच्या या आघाडीत फूट पडू शकते अशाही चर्चा आता सुरू झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने १० जागा लढवल्या. यासंदर्भात एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाविकास आघाडीने एकत्रित लढाव्यात अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी प्रयत्नही करू.  विधानसभेला २८८ जागा आहेत त्यामुळे एकमेकांना समजून घेणे अधिक सोपे होईल. लोकसभा निवडणुकीसाठी ४८ जागा होत्या. आमचा पक्ष लहान असला तरी जनमानसात रुजलेला आहे. त्यामुळे जास्त जागा निवडून आणण्याची क्षमता असतानाही आम्ही कमी जागा घेतल्या, असे शरद पवार म्हणाले.

भाजपला बहुमत मिळालं नाही तर पाठिंबा देणार का? शरद पवारांच्या उत्तरानं पिक्चर क्लिअर..

यंदाच्या निवडणुकीत भाजपला 272 पेक्षा कमी जागा मिळाल्या आणि त्यांनी तुम्हाला साद घातली तर तुमचा पक्ष त्यांच्या सोबत जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, काही कारणच नाही. कारण त्यांची धोरणं आम्हाला पसंत नाहीत. आमचे संबंध व्यक्तिगत असतील. व्यक्तिगत सलोखा आणि राजकीय संबंध यात फरक आहे. उद्या संसदेत आम्ही एकमेकांशी बोलणार नाही असं नाही पण याचा अर्थ संसदेत मी त्यांच्या बाजूने हात वर करणार असे होत नाही.

follow us