Download App

मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी; फैसला होणार?

आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सु्प्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार

Maharashtra MLA Disqualification Case : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी (Maharashtra Elections 2024) सुरू आहे. प्रचाराला सुरूवात झाल आहे. यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (MLA Disqualification Case) आमदार अपात्रता प्रकरणी सु्प्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने (Sharad Pawar) न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात आज न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होणार आहे. दरम्यान, येत्या १० नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आज त्यांच्याकडून काही महत्वाचे निर्देश दिले जाऊ शकतात.

अखेर मुहू्र्त मिळाला! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी या दिवशी सुनावणी; फैसला होणार?

मात्र मध्यंतरीच्या काळात याचिकांवरील सुनावणी रखडली होती. तारखांवर तारखा पडत होत्या. त्यामुळे राजकीय पक्षांत अस्वस्थता वाढली होती. सुनावणी कधी होणार असा प्रश्न विचारला जात होता. आता अखेर या सुनावणीला मुहूर्त मिळाला आहे. आज महत्वाची सुनावणी होणार आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आमदार सुनील प्रभू यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात व्हावी अशी मागणी केली होती. मात्र सुनावणी सर्वोच्च न्यायालयातच होईल असा निर्णय देण्यात आला होता. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालय आज या प्रकरणात निर्णय देणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अशाच पद्धतीने फूट पडली होती. अजित पवार यांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी अपात्र ठरवले नव्हते. या निर्णया विरोधात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) न्यायालयात याचिका दाखल केली होती. या आमदारांना अपात्र करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने धनगर आरक्षण याचिका फेटाळली; हायकोर्टाचा निर्णय ठेवला कायम

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येत्या १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवृत्तीच्या आधी निकाल येईल का याची प्रतिक्षा आहे. शिवसेनेच्या आमदारांचं प्रकरण अतिशय क्लिष्ट आहे. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निकाल आले आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात या प्रकरणाचा निकाल येणार का याची उत्सुकता आहे.

follow us