Download App

“खबरदार, माझ्या वडिलांचा एकेरी भाषेत उल्लेख केला तर”… हर्षवर्धन पाटलांच्या लेकीचा मित्रपक्षांना इशारा

Ankita Patil : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना (Devendra Fadnavis) पत्र पाठवले.  मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत आपल्या जीवाला धोका आहे. राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने काम करत आहे. पण माझ्या तालुक्यामध्ये मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मिळावे आणि सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी भाषेत आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत, असे त्यांनी पत्रात म्हटले होते. त्यांच्या या पत्रामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर आता हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनीही राजकीय विरोधकांना रोखठोक इशारा दिला आहे.

माझ्या वडिलांबाबत असे शब्द वापरले जात असतील आणि माझ्या वडिलांबाबत जर एकेरी शब्द वापरले तर मी सुद्धा त्यांना चांगल्या ठाकरी शैलीत उत्तर देऊ शकते, असे अंकिता पाटील म्हणाल्या. बारामती येथील एका जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले. त्या पुढे म्हणाल्या, आम्ही युवा पिढीतील आहोत. त्यामुळे आम्हाला अन्यायाची भाषा सहन होत नाही. जे तालुकाध्यक्ष आहेत आणि लोकप्रतिनिधींच्या अवतीभवती बसतात. ते जर माझ्या वडिलांबाबत असे अपशब्द वापरत असतील आणि माझ्या वडिलांबाबत एकेरी शब्द वापरले तर मी सुद्धा ठाकरी शैलीत उत्तर देऊ शकते.

Baramati Agro : ‘मी डगमगणार नाही अन् झुकणार नाही’; काररखान्याच्या नोटीसीवरून रोहित पवारांनी सुनावलं

‘त्या’ पत्रात नेमकं काय ?

या पत्रामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी लिहिले आहे की, ते राज्यामध्ये सध्या महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने काम करत आहे. पण माझ्या तालुक्यामध्ये मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मिळावे आणि सभांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी भाषेत आणि शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.

तसेच मला तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देखील दिली जात आहे. त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटत असून ही बाब अत्यंत गांभीर्याने घेण्यात यावी. त्यात आपण तात्काळ लक्ष घालावं आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालावा. याबाबत आपण ठोस भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. अशी विनंती या पत्राद्वारे हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.

follow us