Download App

Ahmednagar News: विखेंचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा…पाहणी…आश्वासन, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

Radhakrishna Vikhe Patil Visit Ahmednagar: गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. (Maharashtra ) यातच नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात अवकाळीने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांनी पारनेर दौरा करत शेतकऱ्यांना (Farmers) नुकसान भरपाईचे आश्वासन देखील दिले होते. मात्र डिसेंबर महिना संपत येऊ लागला तरी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मंत्री असो वा लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधाचे दौरे केले, आश्वसन दिले मात्र बळीराजाची पदरी निराशाच पडली असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

यंदाच्या वर्षी राज्यात अनेक ठिकाणी पर्जन्यमान हे कमी राहिले होते. यामुळे अनेक ठिकाणी शेतात पिके घेणे देखील मुश्किल झाले होते. आधी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याने कसेबसे शेतात पिके घेतली. कर्जपाणी करून शेती केली. शेतात पिके देखील उभी राहिली. पीक विकून पैसे हाती येतील अशी स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले. अवकाळीने हजेरी लावल्याने शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी नेतेमंडळींची धावपळ सुरु झाली. भल्या पहाटे शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी देखील करण्यात आली. त्यांनतर प्रशासनाने देखील मंत्र्यांच्या सूचनेनंतर पंचनामे सुरु केले. पंचनामे झाले तसेच मंत्री महोदयांनी आश्वासन देखील दिले यामुळे आर्थिक मदत देखील मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांना अद्याप देखील नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे मत शेतकऱ्यांनी यव्यक्त केले आहे.

Box Office Collection: ‘सालार’ समोर ‘डंकी’ फिका, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई

पारनेर तालुक्‍यात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसाने शेतातील उभी पिके,जनावरांचा चारा, फळबागा यांचे प्रचंड नुकसान झाले. याचे रितसर पंचनामे झाले आहे. पारनेर तालुक्‍यात झालेल्या गारपीट व पावसाने 10 हजार 452 शेतकऱ्यांच्या शेती पिकांना फटका बसला आहे. तालुका प्रशासनाने 10 कोटी 54 लाख रुपयांची रितसर मागणी ही राज्य शासनाकडे नोंदविली आहे. यातच सर्वाधिक नुकसान पारनेर तालुक्‍यातील सांगवी सुर्या, वडुले, पानोली, गांजी भोवरे या गावांचे झाले, तर निघोज, जवळा, राळेगण थेरपाळ, पिंपळनेर या गावांना तडाका बसला आहे.

Tags

follow us