Download App

Maharashtra Rain : पुढचे चार दिवस राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस, कोकणासह मध्य महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ जारी

  • Written By: Last Updated:

Maharashtra Rain : राज्यात मान्सून दाखल झाल्यापासून राज्यातील काही भागांत पावसाने जणू मुक्कामच केला आहे. तर काही भागांत अद्यापही डोळे लावून पावसाची वाट आहेत. पाऊस होत नसल्याने अनेक भागांतील शेतची कामे रखडले आहेत. कोकणासह, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे तीन ते चार कोकणासह मध्य महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Rain: Heavy rains all over the state for the next four days, ‘Yellow Alert’ issued in Madhya Maharashtra including Konkan)

पुढचे चार दिवस राज्यात मुसळधार

पुढचे चार दिवस राज्यात चांगला पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे हवामान विभाकडून कोकणासह मध्य महाराष्ट्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस मुंबईसह उपनगर ठाणे, कोकणमध्य महाराष्ट्रत मुसळधार पाऊसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास मतदार म्हणतात… जाणून घ्या कौल

मुंबईसह कोकणात पाऊसाची जोरदार बॅटिंग

कोकणासह, मुंंबई, मुंबई उपनगरासह पालघर जिल्ह्यातही पावसाने चांगलाच जोर धरला असून पावसामुळे शहरांतील काही भागांत पाणी साठलंय. त्यामुळे शहरातील वाहतुकीला अडथळा येत आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे आणि पालघरमध्ये चांगलाच पाऊस बरसत आहे. पालघर जिह्यात अनेक ठिकाणी पाऊसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे लोकांना प्रशासनाकडून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच या पाऊसामुळे कोकणात भात लागवडीला वेग आला आहे. यामुळे कोकणातील शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मराठवाडा अद्याप कोरडाच

यंदा राज्यात पाऊसाने उशिरा हजेरी लावली. पाऊस उशिरा आल्याने पेरणीला देखील उशीर झाला. मराठवाडा वगळता राज्याच्या इतर भागात पुरेशी पेरणी झाली. परंतु मराठवाड्यात अजून देखील पुरेसा पाऊस न झाल्याने पेरण्या झालेल्या नाहीत. मराठवाडा अजूनदेखील पाऊसाचा प्रतीक्षेत आहे. पाऊस नसल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. गेल्या 15 दिवसापासून मराठवाड्यात पाऊसाने दडी मारली असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

Tags

follow us