लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास मतदार म्हणतात… जाणून घ्या कौल
NCP Voter survey : राज्यात विधानसभा निवडणूनक 2019 पासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यातच गेल्या वर्षी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंडाचं हत्यार उपसल आणि अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. दरम्यान त्या घडीमोडींना एक वर्ष पूर्ण होत नाही तोच यावर्षी पुन्हा राज्यात मोठा भूकंप झाला आहे. तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केलं आणि ते थेट भाजपच्या सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यातच आता 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर लगेचच महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय पक्ष तयारी लागले आहेत. तसेच अनेकदा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावर एका सर्व्हेमध्ये मतदारांना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी काय म्हटले पाहूयात… ( NCP Voter survey if Upcomig Loksabha and Vidhansabha Elections taken together voter will vote to BJP Congress NCP Shivsena )
बंगळुरूच्या बैठकीसाठी काँग्रेसचे स्पेशल 26, आणखी दोन पक्षांना निमंत्रण
काय आहे हा सर्व्हे?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास जनता म्हणजे मतदार काय करणार? याबाबत प्रश्न विचारण्यात आले होते. त्याला लोकांनी दिलेल्या रेटिंगवरून असे समोर आले आहे की, भाजपला सर्वाधिक रेटींग दिले आहेत. या सर्व्हेक्षणामध्ये सर्वपक्षीय मतदरांचा समावेश करण्यात आला आहे. हा सर्व्हे सकाळ या वृत्त समुहाने केला आहे. यामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास कुणाला मतदान करणार? यावर लोकांना काही प्रश्न विचारण्यत आले त्याला लोकांनी रेटींगच्या स्वरूपात उत्तरं दिली आहेत.
तुमच्यामुळं सगळीकडं फुकट फिरतोय…; आजोबांनी मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर स्पष्टच सांगितलं
काय आहेत प्रश्न आणि रेटींग?
प्रश्न -लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास भाजपचे मतदार दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मत देणार का?
रेटींग – होय -65 टक्के, नाही- 16 टक्के, सांगता येत नाही- 19 टक्के
प्रश्न -लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास मतदार दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाला मत देणार का?
रेटींग – होय -47.9 टक्के, नाही- 27.3 टक्के, सांगता येत नाही- 24.8 टक्के
प्रश्न – आगामी विधानसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाला मत देणार?
रेटींग –
भाजप- 26.8 टक्के
कॉंग्रेस- 19.1 टक्के
राष्ट्रवादी (शरद पवार)-14.9 टक्के
राष्ट्रवादी (अजित पवार)- 5.7 टक्के
शिवसेना (उद्धव ठाकरे )- 4.9 टक्के
शिवसेना (एकनाथ शिंदे )- 12.7 टक्के
मनसे- 2.8 टक्के
वंचित- 2.8 टक्के
इतर 10.3 ( शेकाप, स्वाभिमानी, प्रहार, केसीआर, आप, मविआ)- टक्के