तुमच्यामुळं सगळीकडं फुकट फिरतोय…; आजोबांनी मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर स्पष्टच सांगितलं

तुमच्यामुळं सगळीकडं फुकट फिरतोय…; आजोबांनी मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर स्पष्टच सांगितलं

CM Eknath shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी कोल्हापूर(kolhapur) दौऱ्यावर होते. कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्यावतीने पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर ते करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेले. दर्शन घेऊन बाहेर येत असताना अचानक एका ज्येष्ठ नागरिकाने त्यांना हाक मारली आणि त्यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावेळी त्या आजोबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) यांचे आभारही मानले.(kolhapur CM Eknath shinde meet gradfather says i am travel in freely anywhere in ST Bus)

एकनाथ शिंदे यांची झोप उडविणारा तर अजितदादांचे स्वप्न भंग करणाारा सर्व्हे

घडलं असं की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंबाबाई देवीचे दर्श घेऊन मंदिराबाहेर(temple) येत असताना त्या आजोबांनी अचानक मुख्यमंत्र्यांना आवाज दिला आणि बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी या आजोबांना मुख्यमंत्र्यांनी जवळ बोलवून त्यांच्याशी संवाद साधला.

शिंदेंचं बंड ते राष्ट्रवादीतील फूट मतदारांनी व्यक्त केली नाराजी; कौल कोणाला देणार? सर्व्हे काय सांगतो?

यावेळी त्यानी कोल्हापूर शहराबद्दल बोलण्यासाठी एकदा मुंबईत येऊन आपल्याला भेटायचे असल्याची इच्छा व्यक्त केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण जरूर मुंबईला भेटायला या असे सांगून आपण कोल्हापूर या विषयाबद्दल जे काही बोलायचे आहे, त्यावर आपण सविस्तर बोलू असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजोबांना दिला.

एकनाथ खडसेंकडून ‘या’ भाजप आमदाराविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल

एवढ्यावरच न थांबता या आजोबांनी आपल्या सरकारने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा एसटीमधील प्रवास मोफत केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांचे सर्वांसमक्ष जाहीर आभारही मानले. या निर्णयामुळे मी सध्या सगळीकडे फुकट फिरतोय असे या आजोबांनी मुख्यमंत्र्यांना आवर्जून सांगितले. आजोबांचा हजरजबाबीपणा पाहून सगळेच जण हसू लागले.

युती सरकारने ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा सर्वसामान्य लोकांना नक्की कसा लाभ होतो आहे ते, या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दिसून आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube