एकनाथ खडसेंकडून ‘या’ भाजप आमदाराविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल

एकनाथ खडसेंकडून ‘या’ भाजप आमदाराविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल

Eknath Khadse : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांच्यावर बदनामीकारक वक्तव्य केल्याचे आरोप केले. खडसेंनी चव्हाण यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला आहे. खडसे यांनी हा दावा जिल्हा सत्र न्यायालयात दाखला केला. (Eknath Khadsen claims defamation against BJP MLA Mangesh Chavan)

 

आज माध्यमांशी बोलतांना एकनाथ खडसे यांनी मंगेश चव्हाण यांनी आपली कशी अब्रु हनन केली हे सांगितले. खडसे यांनी बोलतांना सांगितलं, चव्हाण यांनी वेळीवेळी आपल्याविषयी कपाळकंरंटे, पनवती, बेशरम असे शब्द वापरून आपल्याला अपमानित केलं. मी राजकीय जीवनात अनेक महत्वाच्या पदांवर काम गेलं. तीस वर्ष मी आमदार होतो. विधानपरिषद आमदार म्हणून सध्या काम करतो. मी बावीस देशांना भेटी दिल्या. अनेक देशांमध्ये मी शेती, पर्यावरण, जलव्यवस्थापन सेमिनारमध्ये मी सहभागी झालो. अनेक पुरस्कारांनी मला सन्मानीत करण्यात आलं. मात्र, चव्हाण हे माझी समाजात बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Shanaya Kapoor : संजय कपूरच्या मुलीची साऊथ सुपस्टार मोहनलालसोबत धडाकेबाज एन्ट्री! ‘या’ चित्रपटात दिसणार 

राजकीय टीका टिप्पण करतांना आक्षेपार्ह शब्दांत त्यांनी आपल्यावर टीका केली. दरम्यान, मी चव्हाण यांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र, त्यांनी त्या नोटीसला उत्तर दिले नाही. त्यामुळेच त्यांच्यावर आता हा फौजदारी गुन्हा दाखल केल्याचं खडसेंनी सांगितलं. ते म्हणाले, चव्हाण यांना आयपीसी कलम ५०० आणि ६६अ अंतर्गत मानहानीची शिक्षा द्यावी आणि ५१ हजार रुपयांचा प्रतिकात्मक दंड द्यावा, अशी मागणी करत हा खटला फास्ट चालवावा, अशी विनंती कोर्टाला केल्याचं खडसेंनी सांगितल.

या प्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश आर. वाय. खंदारे यांच्याकोर्टासमोर सुनावणी सुरू असून खडसे यांच्या वतीने अॅड. अतुल सूर्यवंशी हे काम पाहत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करत अब्रुनुकसानीचा दावा केला होता, यात तडजोड झाली होती. हा वाद शांत होत नाही तोच आता आमदार खडसेंनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर जळगाव जिल्हा न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला. त्यामुळं हे प्रकरण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनलं आहे. दरम्यान, खडसेंनी चव्हाण यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्यात पुढं काय होतं, याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube