Download App

राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस; सोलापुरात घरांमध्येच शिरलं पाणी…

Maharashtra Rain News : राज्यभरात विविध ठिकाणी वरुणराजानं (Rain)हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मुंबईमध्ये (Mumbai)दोन दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर धरला आहे. दरवर्षीप्रमाणे पहिल्याच पावसाने मुंबई तुंबलेली पाहायला मिळाली. त्याचबरोबर राज्यातील अहमदनगर(Ahmednagar), छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar), पालघर(Palghar), वाशिम(Washim), सोलापूर(Solapur), पुणे, वसई, विरार, कोल्हापूर (Kolhapur) आदी विविध भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. त्यातच सोलापूरच्या काही भागांमध्ये तर नागरिकांच्या घरांमध्येच पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. (maharashtra-rain-news-mumbai-water-entered-the-houses-in-solapur)

Mumbai Rain; पाणी साचल्याने अंधेरी मेट्रो बंद, पहिल्याच दिवशी मुंबईकरांची तारांबळ

मुंबईमध्ये आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मुंबईमधील सखल भागात पाणी भरल्याचं पाहायला मिळालं. मुंबई उपनगरामधील दहिसर भागात सुरु असलेल्या पावसामुळे दहिसर पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.

Letsupp Special : 288 शाखा अन् दोन लाख पदाधिकाऱ्यांची फौज; बीआरएसची प्रचंड वेगाने घौडदौड

अहमदनगर जिल्ह्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेक दिवसांपासून आभाळाकडं डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आशा काही प्रमाणात का होईना पण पल्लवीत झाल्या आहेत. अहमदनगर शहरामध्ये शनिवारी जोरदार पावसाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं.

शनिवारी सोलापुरात झालेल्या पहिल्याच पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले. याचा शहरातील विविध भागातील नागरिकांना फटका बसला आहे. शहरातील 70 फूट रोडमुळे कोनापुरे चाळ परिसरातील अेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळाले.

वाशिम जिल्ह्यात मध्यरात्री विविध भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. सलग दोन दिवसांपासून होणाऱ्या या पावसामुळे वातावरणामध्ये चांगलाच गारवा पसरलेला आहे.

वसईमध्ये एका जर्जर इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक सुरु झालेल्या पावसाने वसईच्या हत्तीमोहला परिसरातील एका इमारतीचा भाग कोसळल्याचे पाहायला मिळाले. जून महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसात एका इमारतीचा काही भाग कोसळल्याने जुन्या इमारतींच्या प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात वरुणराजाचं आगमन झालं आहे. पैठण तालुक्यात पाचोडसह अनेक गावांमध्ये पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उशीरा का होईना पण हसू उमटल्याचं पाहायला मिळत आहे.

Tags

follow us