Mansoon : मागील 15 दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागांत पावसाने (Mansoon) जोरदार बॅटिंग केल्याचं चित्र दिसून आलं होतं. अनेक जिल्ह्यांमध्ये नदी, नाले दुथडी भरुन वाहत होते, तर काही ठिकाणी पुराची परिस्थिती असल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने बरसण्यास सुरुवात केलीयं. पुणे, रायगड, अहिल्यानगरसह अनेक जिल्ह्यांत आज जोरदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे वातावरण थंड पडलं असून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
मागील 7 दिवसांपासून पुण्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मागील शनिवार, रविवारी जोरदार पाऊस बरसला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यातील कोथरुडमध्ये पाऊस बरसला आहे. पुण्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. जोरदार पावसाने वातावरण थंड पडले असून नागरिकांना मुसळधार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
रायगड जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी पुरजन्य परिस्थिती असल्याचं दिसून आलं होतं. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा पाऊस बरला असून रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, खालापूर परिसरात पावसाच्या सरी बरसल्या आहेत.
“पुढील दोन दिवसांत सोनम वांगचूक यांचा जीव जाऊ शकतो” हायकोर्टात केली वैद्यकीय मदतीची याचिका दाखल!
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वर्गाने पेरणी केल्यानंतर पावसाच्या प्रतिक्षेत होता. मात्र समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत शेतकरी वर्ग चिंतेत दिसत असला तरीही शेतकरी वर्गातून दुबार पेरणीची तयारी असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता मुसळधार पाऊस बरसल्यास शेतकऱ्यांसाठी दिलासा ठरेल एवढं मात्र नक्की..
