Maharashtra Rain Update : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी पाऊस (Maharashtra Rain Update ) झाला मात्र आता पुन्हा पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मात्र आता परतीच्या पावसाचं आगमन होणार आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक राज्यांसह महाराष्ट्रात देखील मान्सून परतल्याने उष्णता वाढली आहे.
Udhav Thackery यांचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार? शिंदे गटाचं एक पाऊल मागे
12 ऑक्टोबरनंतर पडणार पाऊस…
देशामध्ये अनेक राज्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झाल्यानंतर आता 12 ऑक्टोबरनंतर देशातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. असा इशारा भारतीय हवामा विभागाने दिला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या भागांमध्ये येत्या 24 तासांत पावसाची शक्यता आहे.
दोन दिवसांत मान्सून माघारी परतणार…
दरम्यान हा परतीचा पाऊस असणार आहे. कारण देशातील विविध भागांमधून मान्सून माघारी परतायला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये पुढील दोन दिवसांत पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेचा पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रातील काही भागांमधून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान यंदा राज्यात पावसाने दडी मारली आहे. काही भागात जास्त पाऊस तर काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील धरणेही भरलेली नाही. त्यामुळे परतीचा पाऊस देखील न पडल्यास राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची आहे. राज्यात पावसाने दडी मारल्याने अनेक गावे व वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या राज्यातील 350 गावे आणि 1 हजार 319 गावांना 369 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या आठवड्यात साडेतीनशे टँकर सुरू होते. मराठवाड्यात सध्या 57 गावे आणि 22 वाड्यांना 84 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात आहे.