Download App

सावधान! पुढील पाच दिवस धोक्याचे, वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार; हवामान विभागाचा इशारा

16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिला आहे.

Maharashtra Rain Updates : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर प्रचंड (Heavy Rain in Maharashtra) वाढला आहे. काल दहिहंडीच्या दिवशी अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) झाला. सर्वाधिक पाऊस मुंबई शहरात (Mumbai Rains) झाला. या शहराला काल हवामान विभागाने रेड अलर्ट दिला (IMD Rain Alert) होता. दरम्यान, राज्यावरचं हे पावसाचा थैमान आणखी चार ते पाच दिवस कायम राहणार आहे. 16 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राने दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह वादळी वारे वाहतील. या वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असा राहील. 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वाऱ्यांसह समुद्रात स्थिती खवळलेली राहील. अशा परिस्थितीत मच्छीमारांनी समु्द्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात पुढील 24 तास महत्वाचे, ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट; अतिमुसळधार पाऊस झोडपणार

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत जोरदार पाऊस होत आहे. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत तीन ते चार दिवसांपासून सूर्यदर्शन झालेले नाही. अहिल्यानगर जिल्ह्यातही अशीच स्थिती आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाचा मुक्काम कायम आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार काल अहिल्यानगर जिल्ह्यासह पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. आजही या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे.

प्रशासनाच्या नागरिकांना सूचना

नागरिकांनी अशा परिस्थितीत घराबाहेर न घोंडता सतर्क राहावं; प्रशासन आणि बचाव यंत्रणांनी पूर, व्यापार आणि रहदारी व्यवस्थापनासाठी सज्ज राहावं, ही विनंती संबंधित अधिकाऱ्यांनी केली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडता, अलर्टची सतत माहिती घेत, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. फारच महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडता येईल.

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. या भागात नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठीही जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी या काळात सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, मांजरा प्रकल्प तब्बल 80 % भरला, नाकरिकांना सतर्कतेचा इशारा

follow us