Download App

Rain Update : छत्री घेऊनच बाहेर पडा! कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम…

पुढील तीन दिवस कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार बरणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.

Maharshtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील काही भागांत आजही मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस (Maharshtra Rain ) पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं. कोकण, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याचं इशारा देण्यात आलायं.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या ! नवलकिशोर राम यांच्या खांद्यावर पुणे महापालिका आयुक्तपदाची धुरा

रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, पुणे, कोल्हापुरच्या घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस जोरदार वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तसेच सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, अहिल्यानगर, जळगाव, नागपूर, वर्धा, वाशिम यवतमाळमध्येही हलक्या ते मध्यम स्वरुपात पाऊस पडणार आहे.

हागवणेंची फॉर्च्युनर अजितदादांचा प्रश्न अन् आता पोलिसांची जप्ती; चौकशीचा फास आणखी आवळला…

पुढचे दोन दिवस अतिवृष्टी…
राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातलायं. 21 ते 23 मेदरम्यान, कोल्हापुर, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्गात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलायं. त्यामुळे या भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Video : ‘…असं फक्त पवारांचा पठ्ठ्याचं करू शकतो’; पुणे जलमय होताच रस्त्यावर केलं अनोखं आंदोलन

पुढील चार दिवस पुणे, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 20 मे च्या रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम पाहायला मिळाला. ज्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला.

follow us