हागवणेंची फॉर्च्युनर अजितदादांचा प्रश्न अन् आता पोलिसांची जप्ती; चौकशीचा फास आणखी आवळला…

Vaishnavi Hagawane : पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. (Hagawane) या घटनेनंतर वैष्णवीच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यांसाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, त्यांनी लग्नात हागवणे यांच्याशी अजित पवार काय बोलले होते यावरही भाष्य केलं आहे.
फक्त वैष्णवीच नाही मोठ्या सुनेचा देखील हगवणे कुटुंबाने केला छळ, कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण
वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार लग्नात मुलाला लग्नात हुंडा म्हणून 51 तोळे सोनं, 7.5 किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या सनीज वर्ल्ड येथे झालेल्या लग्नाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवारही उपस्थित होते. त्यावेळी अजित पवार यांनी हुंड्यात देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीविषयी विचारणा केल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आता ती फॉर्च्युनर कार जप्त केली आहे.
अजित पवार वैष्णवीच्या लग्नाला आले होते. त्यांनी लग्न मंडपात फोर्चुनर गाडी पाहून वैष्णवी आणि शशांक यांना आशीर्वाद देताना राजेंद्र हगवणे यांना विचारलं होतं की, ही गाडी तुम्ही मागितली आहे की त्यांनी दिली आहे. तेव्हा तिथे अनेकजण उपस्थित होते. अजित पवारांनी राजेंद्र हगवणेंना विचारलेला प्रश्न ऐकून तेव्हा सगळेच हसले. अजित पवार यांनी खोचकपणे तो प्रश्न हगवणेंना विचारला होता, असं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं आहे.
आमची अजितदादांपर्यंत ओळख नाही
राजेंद्र हगवणे हे अजितदादांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. हगवणे यांचे अजितदादांशी जवळचे संबंध आहेत. राजेंद्र हगवणे यांच्या मोठ्या सूनेच्या बाबतही असाच प्रकार घडला होता. नोव्हेंबर 2024 मध्ये तिने पोलिसांत तक्रार दिली होती. ती केस अजूनही सुरु आहे. मात्र, ते प्रकरण दाबण्यात आले. हगवणेंची मोठी सून माझ्या मुलीच्या अंत्ययात्रेला आली होती. तिनेदेखील वैष्णवीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आम्हाला सांगितलं असंही ते म्हणाले आहेत. अजित पवार यांना या सगळ्याची कल्पना असावी. त्यांनी लक्ष घालाव अन् यातील आरोपींना अटक व्हावी असं वैष्णवीचे वडील म्हणाले.
पुण्यातील अजितदादा गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. त्यानंतर आता हागवणेंची फॉर्च्युनर कार पोलिसांनी जप्त केली आहे.#VaishnaviHagwane #RajendraHagavane pic.twitter.com/WIHChEMnjX
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) May 21, 2025