खुर्चीची इभ्रत अन् गरिमा राखा, प्रकाश आंबेडकरांचा चीफ जस्टीस गवई यांना मोठा सल्ला

खुर्चीची इभ्रत अन् गरिमा राखा, प्रकाश आंबेडकरांचा चीफ जस्टीस गवई यांना मोठा सल्ला

Prakash Ambedkar On Bhushan Gavai : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) थेट भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनाच (Bhushan Gavai) सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. चिफ जस्टीस भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत आणि गरिमा राखली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. त्यांनी असं का म्हटलंय, ते आपण सविस्तर जाणून घेऊ या.

भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई जेव्ह खुर्चीवर बसतात, तेव्हा ज्यांनी त्यांच्या सन्मानाकडे दुर्लक्ष केलं, अशा सेक्रेटरींना गवई यांनी नोटीस बजावली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांना दिला आहे. प्रकाश आंबेडकर धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतानान बोलत होते.

ब्रेकिंग : पाकिस्तानात स्कूलबसवर दहशतवादी हल्ला, चार विद्यार्थ्यांचा मृत्यू; 38 जखमी

प्रकाश आंबेडकरांनी याप्रकरणी म्हटलंय की, सरकारची मानसिकता आहे किंवा नाही, हा वेगळा भाग आहे. तुम्हाला लोकांनी चिफ जस्टीस केलंय. तुम्ही तुमच्या हिमतीवर चिफ जस्टीस म्हणून गेलेले आहात. आता स्वत:ची इभ्रत ही स्वत:चं राखली पाहिजे. मी अपेक्षा करतो की, बेंचवर बसल्यानंतर जे आले नाहीत त्यांना ते नोटीस काढतील. महाराष्ट्र शासन काय करतं न करतं हा वेगळा भाग आहे. परंतु तुम्ही चिफ जस्टीस म्हणून त्या गादिची गरिमा ठेवणार आहात की नाही, हा प्रश्न आहे. चिफ जस्टीस गवई आहेत, त्यांनी त्यांची गरिमा राखून ठेवली पाहिजे, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी चीफ जस्टीस गवई यांना सल्ला दिला आहे.

फक्त वैष्णवीच नाही…मोठ्या सुनेचा देखील हगवणे कुटुंबाने केला छळ, कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण

भारताचे सरन्यायाधीश असलेल्या भूषण गवई यांचा नुकताच मुंबईत बार कौन्सिलतर्फे सत्कार झाला. या सत्कार सोहळ्यात सरन्यायाधीशांनी राज्याचे पोलीस प्रमुख, मुख्य सचिव आणि मुंबई पोलीस आयुक्त यांचे कान टोचले. त्यानंतर धावत पळत तिन्ही अधिकारी प्रोटोकॉलनुसार सरन्यायाधीशांच्या स्वागताला पोहोचले होते. याच मुद्द्यावर प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचं बोट ठेवलं आहे. राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला नसल्याची तक्रार देखील गवई यांनी केली आहे. त्यानंतर आंबेडकरांनी आज गवई यांना सल्लाच दिलाय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube