महाराष्ट्र, गुजरातसह ‘या’ राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; अलर्ट जारी

महाराष्ट्र, गुजरातसह ‘या’ राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस; अलर्ट जारी

IMD Rain Alert : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर आता पुढील पाच दिवस महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाची (IMD Rain Alert) शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. तर तामिळनाडूमध्ये तीन ते चार दिवस असेच हवामान राहण्याची शक्यता आहे.

तर पुढील पाच दिवस ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पुढील तीन दिवस उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये असेच हवामान राहील. 15-18 मे दरम्यान उत्तर प्रदेशात आणि 15-17 मे दरम्यान पश्चिम राजस्थानात उष्णतेची लाट येण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तर अरुणाचल प्रदेशात 15-18 मे रोजी, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरामध्ये  15 मे रोजी मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय, 15 आणि 16 तारखेला आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तर, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे 14-18 मे रोजी, गुजरातमध्ये 14 आणि 15 मे रोजी पाऊस पडेल. 15 मे रोजी मध्य महाराष्ट्रात 70 किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. तर तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल येथे 14-16 मे रोजी, कर्नाटकच्या किनारी भागात 14-18 मे रोजी, कर्नाटकच्या उत्तर भागात 14-18 मे रोजी, कर्नाटकच्या दक्षिण भागात 14, 15 मे आणि 18 मे रोजी, आंध्र प्रदेशच्या किनारी भागात 15 मे रोजी, केरळच्या माहे येथे 14 मे आणि 18-20 मे रोजी मुसळधार पाऊस पडेल.

व्हॉट्सॲप आणणार जबरदस्त फीचर्स, स्टेटस करता येणार रिशेअर अन् फॉरवर्ड

हवामान विभागाच्या मते, वायव्य भारतात 18-20 मे रोजी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, 14मे रोजी राजस्थान, 14 आणि 16 मे रोजी पंजाब, हरियाणा, 15 आणि 16 मे रोजी उत्तराखंड, 17 आणि 18 मे रोजी पश्चिम राजस्थानमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube