Maharashtra Rain Update : जूनच्या अखेरीस का होईना पण वरुणराजाचं महाराष्ट्रात (Maharashtra Rain)आगमन झालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांत मान्सून राज्यात सर्वदूर काही प्रमामात दाखल झाला आहे. राज्याच्या काही भागात मध्यम तर काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे. काही भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. त्यातच आता हवामान विभागाकडून आज आणि उद्या दोन दिवस मुंबई, पुणे जिल्ह्यासह नाशिक, पालघर, ठाणे, सातारा, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.(maharashtra-rain-update-mumbai-pune-heavy-to-very-heavy-rainfall-alert)
Darshana Pawar Murder Case : आधी गळ्यावर कटरनं वार मग डोक्यात दगड; राहुलची कबुली
राज्यात आजपासून दोन दिवस पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, कोकणसह मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील दोन दिवसात मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यत हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
भगीरथ भालकेच्या बीआरएस पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी आक्रमक, उमेश पाटलांनी दिला थेट इशारा…
बंगालच्या उपसागरामधील वाऱ्याच्या स्थितीमुळे राज्यातील पावसाचा जोर वाढल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे राज्यात आज (दि.27) आणि उद्या (दि.28) सर्वदूर पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवस विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुंबईमध्ये आजपासून दोन दिवस मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. आज मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या बुधवारी मुंबईत यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.