Darshana Pawar Murder Case : आधी गळ्यावर कटरनं वार मग डोक्यात दगड; राहुलची कबुली
Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार हत्या प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. दर्शनाच्या हत्या प्रकरणी राहुल हांडोरे (Rahul Handore)पोलिसांच्या (Pune Police)ताब्यात आहे. राहुलने आपणच दर्शनाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्यातच आता राहुने दर्शनाची हत्या नेमकी कशी केली, याची माहिती पोलिसांच्या चौकशी दरम्यान दिली आहे. राहुलने सांगितले की, दर्शनाने लग्नाला नकार दिल्याने दोघांमध्ये झालेल्या वादामध्ये रागाच्या भरात दर्शनावर सुरुवातीला कंपासमधील कटरने तीन चार वार केले. त्यावेळी कटर दर्शनाच्या गळ्याला लागल्याने गळ्यातून रक्त येण्यास सुरुवात झाली, मग डोक्यात दगड घालून दर्शनाचा खून केल्याची कबुली राहुलनं पोलिसांना दिली. त्यानंतर आपला दर्शनाला मारण्याचा हेतू नव्हता पण अनावधानाने हे सर्व घडल्याचंही राहुलनं सांगितलं आहे. (darshana-pawar-murder-case-new-update-rahul-handore-confession)
एमआयडीसीसाठी केवळ स्टंटबाजी; सुजय विखेंचा रोहित पवारांवर निशाणा
एमपीएससीमध्ये राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार हिचा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. या घटनेनंतर दर्शनासोबत गेलेला तिचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता होता.
पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. ज्यात दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक जखमा आढळून आल्या होत्या. यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचे अहवालामध्ये नमुद करण्यात आले होते.
MPSC उत्तीर्ण झाल्यानंतर दर्शनाची वनअधिकारी पदी निवड झाली होती. त्यानंतर दर्शनाने राहुलला लग्नासाठी नकार दिला होता. यातूनच राहुलने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांना होता. दर्शनाचा खून झाल्यानंतर राहुल फरार होता. त्याला पोलिसांनी पकडले. त्यानंतर आपणच दर्शनाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली.
दर्शनाच्या पोस्ट मॉर्टम रिपोर्टमधून काही गोष्टी समोर आल्या आहेत. ज्यात तिच्या शरिरावर हल्ल्याचे व्रण असून डोक्यावरदेखील दगडाने वार केल्याच्या खुणा आहेत. घटनेच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता दर्शना आणि राहुलने राजगड किल्ला चढण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर साधारण 11.45 च्या सुमारास राहुल एकटाच खाली येताना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये दिसून आला.
तेव्हापासून राहुल बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पाच पथकं विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती. त्यानंतर राहुलला मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली.
दर्शनाच्या मामाचे घर आणि राहुलचे घर समोरा समोर होते. तेव्हापासून ते एकमेकांना ओळखत होते. राहुलदेखील MPSC परीक्षांची तयारी करत होता त्यासोबतच तो पुण्यामध्ये पार्ट टाईम फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.