Download App

गेल्या 24 तासात सर्वांधिक पाऊस कुठे? हवामान विभागाकडून अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना?

Maharashtra Rain Update Of Last 24 Hours : विदर्भातील काही भाग वगळता पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं राज्यातील धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली (Maharashtra Rain Update) आहे. तर, दुसरीकडे राज्यात गेल्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळं (Maharashtra Weather Update) दरड कोसळणे, भिंत कोसळणे, यामुळं काहीजण जखमी झाल्याचीही घटना घडल्या आहेत. गेल्या 24 तासात सर्वांधिक पाऊस कुठे झाला आहे, ते जाणून घेऊ या.

गेल्या 24 तासांत सर्वांधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात?

– पालघर 82.2 मि. मी
– रायगड 82.2 मि. मी
– मुंबई शहर 61.2 मि. मी
– ठाणे 59.3 मि. मी
– रत्नागिरी 50.6 मि. मी

Pahagam Attack : दहशतवाद्यांना आश्रय दिलेल्या दोन आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी

ऑरेंज अलर्ट कुठे?

दरम्यान, राज्यातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर पुढील 24 तासांत रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीला आज संध्याकाळी 5.30 वाजल्यापासून ते उद्या 25 जूनपासून रात्री 8.30 वाजेपर्यंत 4.2 मीटर उंच लाटांचा इशारा इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसकडून देण्यात आला आहे. लहान होड्यांना समुद्रास न जाण्याचा सुचना देण्यात आल्या आहेत.

मोठी बातमी! माळेगाव साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांनी मारली बाजी, वाचा निकाल…

जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर…

दुसरीकडे मुसळधार पावसामुळं कोकणातील रत्नाकिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि रायगड कुंडलिका नदी इशारा पातळीवर आहे, याबाबत नागरिकांना अलर्ट करण्यात आले आहे. तर पालघर जिल्ह्यातील सूर्या नदीत पाणी पातळी वाढल्याने एक बोट नदीत अडकली होती. मात्र ही बोट एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने बोटीला सुखरुप बाहेर काढले. तर पुणे जिल्ह्यातील माळीण, ता. आंबेगाव येथे जमिनीला भेगा पडून दरड कोसळली. या घटना राज्यात मुसळधार पावसामुळे घडल्या आहेत.

 

follow us