Maharashtra Rain Update : राज्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस (Maharashtra Rain) कोसळत आहे. विदर्भ मराठवाड्यात तर पावसाने हाहाकार उडाला (Heavy Rain) आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. जनावरे दगावली आहेत. तसेच काही लोकांचा मृत्यू झाला आहे. आता मराठवाड्यातील पावसाचा जोर कमी होऊन कोकणात जोरदार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त (Weather Update) करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या नव्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यात आता हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल. तर मुंबई उपनगर, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाचे रौद्र रुप पाहण्यास मिळेल. मागील चार ते पाच दिवसांपासून पावसाने विदर्भ आणि मराठवाड्याला झोडपून काढलं आहे. अरबी समुद्रात सक्रिय झालेल्या चक्री वादळाने तुफान पाऊस झाला. त्यामुळे विहीरी आणि धरणं भरली आहेत. खरीप हंगामात पिकांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटला आहे.
धक्कादायक! पावसाच्या तडाख्याने मराठवाड्यात 12 मृत्यू; 5 लाख हेक्टरवरील पिके जमीनदोस्त..
राज्यात आज मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड, रत्नागिरी कोकणातील काही भाग, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार आणि जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
या पावसाचा शेतातील पिकांना मोठा फटका बसला आहे. 4 लाख 96 हजार 392 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. 11 हजार 497 हेक्टर बागायत क्षेत्राचे नुकसान झाले आहे. सहा लाखांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच दोन दिवसांच्या या पावसाने तब्बल 12 जणांचा मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1, जालना 2, हिंगोली, बीड, लातूर जिल्ह्यात प्रत्येकी एखक जणाचा मृत्यू झाला आहे.
4 Sept, 6.20am,Latest satellite obs over South East region indicate, multilayered cloud bands over parts of Coastal Andhrapradesh,Telangana & adj districts of Marathwada of Maharashtra.Possibility of intermittent showers over these areas during next 3,4hrs. Watch IMD updates pl. pic.twitter.com/DorwpDmfVC
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 4, 2024
मराठवाड्यात पावसाने मोठे नुकसान केले आहे. तब्बल 1 हजार 454 गावांना फटका बसला आहे. पावसामुळे अनेक गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आतापर्यंत 169 जनावरेही दगावली आहेत. अनेक ठिकाणी पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले जात आहे.