Sadanand Kadam : दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना काल अटक केली होती. त्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले त्यावेळी न्यायलयाने कदम यांना 15 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टप्रकरणी (Sai Resort) रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadananda Kadam) यांना ईडीने ताब्यात घेतले होते. त्यांना शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 15 मार्चपर्यंत ईडी कोठडीत कदम यांची रवानगी केली आहे. खेडमधील कुडोशी येथील त्यांच्या अनिकत फार्म हाऊस या निवासस्थानातून सदानंद कदम यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते.
रामदास कदमांना धक्का, बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात
दापोली, मुरुड येथील साई रिसॉर्टची मालकी सध्या सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान बंधू आहेत. सदानंद कदम यांच्या अटकेनंतर किरीट सोमय्या यांनी अब तेरा क्या होगा अनिल परब, असा सवाल विचारला आहे. त्यामुळे आता अनिल परब यांना अटक होणार का? हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.
#UPDATE | Former Maharashtra minister Anil Parab's business partner, Sadanand Kadam remanded to ED custody till March 15.
— ANI (@ANI) March 11, 2023