Download App

काँग्रेसला धुतलं! प्रविण गायकवाड यांनी सांगितलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं राजकारण

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना मश्गुल असतात. मस्तीत असतात. बेफाम असतात. त्यांना संस्कार, संस्कृती, विचारधारा यांमुळे सत्तांतर होतं यावर विश्वासच नाही. त्यांचे राज्यातील राजकारण हे सहकाराच्या माध्यमातून आहे. सहकारी संस्था ताब्यात ठेवायच्या, मतांचं गणित जुळवायचं आणि आपले किल्ले शाबूत ठेवायचे असे त्यांचे धोरण आहे, अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी काँग्रेसवर (Congress) घणाघाती टीका केली. लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी गायकवाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक मते व्यक्त केली.

भाजपमधील सर्वजण काय धुतल्या तांदळासारखे आहेत का? राजू शेट्टींचा सवाल

गायकवाड पुढे म्हणाले, राज्य सरकारने आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला. त्या कार्यक्रमाला वीस लाख लोक उपस्थित होते. सांगितले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना आदरस्थानी मानतात म्हणून हा पुरस्कार त्यांना दिला गेला असंही मानलं जाते. याआधी काँग्रेस-राष्ट्रवादी असताना आप्पासाहेब यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनाही असाच पुरस्कार दिला होता. निरुपण करण्याची त्यांची चारशे वर्षांपासूनची परंपरा आहे.

मुळात हा कार्यक्रम एखाद्या चांगल्या सभागृहात झाला असता. ते चांगले झाले असते. परंतु, या पुरस्काराचे राजकीयकरण झाले आहे. हे आपल्याला आता मान्य केले पाहिजे. धर्माधिकारी यांना मानणारा जो वर्ग आहे त्याचा पाठिंबा आपल्याला मिळावा आणि येणाऱ्या निवडणुकांत राजकारणात त्याची मदत व्हावी ही या पुरस्काराची आताची स्थिती आहे, असे त्यांनी सांगितले.

जयंत पाटलांच्या चौकशीवर देशमुख भडकले; म्हणाले, ‘त्यांच्या’कडून राष्ट्रवादी काँग्रेसला..

महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना आम्ही डॉ. आ. ह. साळुंखे, जयसिंगराव पवार यांची माहिती गोळा करून राज्य सरकारला दिली होती. परंतु, त्यावर पुढे काहीच निर्णय झाला नाही, अशी खंत गायकवाड यांनी व्यक्त केली. मुळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत असतात तेव्हा ते मश्गुल असतात. बेफाम असतात. संस्कार, संस्कृती आणि विचारधारा यांमुळे सत्तांतर होतं यांवर त्यांचा विश्वास नाही. सहकाराच्या माध्यमातूनच त्यांचं येथे राजकारण चालतं, असे गायकवाड म्हणाले.

Tags

follow us