Pravin Gaikwad Criticized Congress Party Politics : काँग्रेस (Congress) पक्षात प्रवेश करत पुणे लोकसभेसाठी तिकीटाची मागणी केली. पण काँग्रेसनं तिकीट दिलं नाही. या मतदारसंघात मोहन जोशी (Mohan Joshi) यांचा दारूण पराभव झाला. निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आमच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नाही. सहभागी करून घेतले नाही. काँग्रेस किती गंभीरपणे राजकारण करतो हा माझ्या मनात प्रश्न आहे.
त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांची काही कारणांमुळे भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला पुढील विचार काय असं विचारलं. त्यावेळी मी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितलं की काँग्रेसमधील प्रवेश ही माझ्या आयुष्यातील मोठी चूक होती. माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही तेच उत्तर दिलं, अशा शब्दांत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी काँग्रेसच्या राजकारणावर नाराजी व्यक्त केली.
काँग्रेसला धुतलं! प्रविण गायकवाड यांनी सांगितलं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सत्तेचं राजकारण
लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात लेट्सअपचे संपादक योगेश कुटे यांनी गायकवाड यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली रोखठोक मते व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले, राजकारण हे व्यवहारावर चालतं. आज पक्षांतर अनेक लोक करतात. ते सहज करतात. अगदी विचारधारेच्या विरोधात जाऊन ते सत्ताकारण करतात. पण, सामाजिक कार्यकर्त्याला नेहमीच असे वाटते की ज्या विचारधारेनं आपण काम करतो तेच पक्ष आपण निवडले पाहिजेत आणि त्यांचच सरकार आलं पाहिजे. म्हणून मी पहिल्यांदा शेतकरी कामगार पक्षात गेलो होतो. शिवराज्य पक्ष होता. मीही काही काळ अध्यक्ष होतो. त्याला काही यश मिळालं नाही. लोकशाहीत सत्ता असल्याशिवाय कामं होत नाहीत, अशी एक धारणा आहे. म्हणून पुरुषोत्तम खेडेकरांनी एक प्रस्ताव मांडला की आपण संभाजी ब्रिगेडला राजकीय पक्ष करू. त्यावर माझे आणि त्यांचे मतभेद झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कामगार पक्षात काम केले. पण, 2014 मध्ये भाजपचे सरकार आले. त्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली. भाजपचा जो विचार आहे त्याच्या अगदी विरुद्ध मी काम करतो म्हणून काँग्रेसच्या लोकांकडून असा प्रस्ताव आला की कन्हैय्याकुमार, हार्दिक पटेल आणि मी अशा तिघांना पक्षात आणण्याची योजना काँग्रेसनं बनवली. त्यानंतर सहा सात महिने चर्चा झाली आणि मी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मी काँग्रेसकडे पुणे लोकसभा तिकीटाची मागणी केली. त्यावेळच्या सामाजिक समीकरणाचा विचार केला तर निवडून येण्याची शक्यताही होती.
पण काँग्रेसनं मला तिकीट का द्यावं? कारण, मी काँग्रेससाठी कधी काम केलेलं नाही. तसेच त्यां पक्षातील अंतर्गत बाबी, स्थानिक नेतृत्व आणि इथल्या आठ प्रमुख नेत्यांनी पक्षाला कळवलं की बाहेरच्या नेत्याला तिकीट देऊ नये. पण या मतदारसंघात मोहन जोशींचा जो दारूण पराभव झाला त्यानंतर अनेकांनी असे म्हटले होते की कदाचित मला जर तिकीट मिळालं असतं तर मी निवडून आलो असतो. त्यावेळी नक्की काय परिस्थिती होती हे मला माहिती नाही.
निवडणुका संपल्यानंतर काँग्रेसने आमच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नाही. सहभागी करून घेतले नाही. काँग्रेस किती गंभीरपणे राजकारण करते याबाबत माझ्या मनात प्रश्नच आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माझी काही कारणांनी भेट झाली. त्यांनी मला पुढील विचार विचारला त्यावेळी मी त्यांना अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं की काँग्रेसमधला प्रवेश ही माझ्या आयुष्यातली मोठी चूक होती. त्यानंतर बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) भेटले त्यांनीही विचारलं पुढं काय ? मी म्हणालो ज्या काँग्रेसला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची किंवा मतांची म्हणा नोंद घ्यावीशी वाटत नाही त्या काँग्रेसमध्ये प्रवेश करून मी मोठी चूक केली असे मी त्यांनाही सांगितले.