कोपरगावकरांच्या काळजीपोटी आशुतोषची लाडकी दादागिरी सहन करणार; अजित पवारांचा शब्द
Ajit Pawar : आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी असतचो, त्यामुळे त्याची ही लाडकी दादागिरी मी यापुढेही सहन करीन
Ajit Pawar on Ashutosh Kale: तुमचा आशुतोष कधी कधी लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो. संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, मी जर एकदा सांगितले की, नाही भेटणार म्हणजे नाही भेटणार, परंतु आमदार आशुतोष काळे ( Ashutosh Kale) माझ्यावर लाडाची दादागिरी करतो आणि दादागिरी मी पण सहन करतो कारण त्याची ही लाडकी दादागिरी आहे. आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी असतचो, त्यामुळे त्याची ही लाडकी दादागिरी मी यापुढेही सहन करीन अशी ग्वाही देवून आ. आशुतोष काळेंच्या विकासाच्या संकल्पना सत्यात उतरविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.
कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या प्रचारार्थ कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत पमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. त्यावेळी ते म्हणाले, मागील महिन्यात कोपरगावात बिबट्याने हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या. त्यावेळी नागरिकांनी रस्ता रोको केला होता तेव्हा आशुतोषने मला फोन केला. मी महत्वाच्या मिटिंगमध्ये होतो. मला पुरवणी मागण्या सादर करायच्या होत्या, मी माझ्या पीएला सांगितले मी आता नाही मिटिंग संपल्यावर बोलतो. त्यावेळी आशुतोषने सांगितले, दादा मिटिंगमध्ये असले तरी मला आत्ताच बोलायचे आहे. मी ऐकणार नाही, मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे. माझे महत्वाचे काम आहे. माझे आत्ताची आत्ता दादांशी बोलणे करून द्या. पुन्हा पीए आले आणि म्हणाले ते ऐकत नाही. त्यावेळी मला वाटले आशुतोषचे नक्कीच काहीतरी महत्वाचे काम आहे. त्यावेळी आशुतोषने मला बिबट्याच्या हल्याची घटना कथन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगितले. त्यावेळी सर्व उपस्थित नागरीकांशी संवाद साधून त्यांनंतर क्षणाचाही विलंब करता जिल्हाधिकाऱ्यांना दोन करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. तुमचा आशुतोष कधी कधी लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो. (Ajit Pawar on Ashutosh Kale Kopergaon nagarpalika election)
कर्नाटक काँग्रेस सरकारमधील संघर्ष टोकाला, डी.के सीएम होणार की सिद्धरामय्या कायम राहणार?
अजित पवार म्हणाले, राज्यात नगरपालिका आणि नगरपरिषदा यांच्या निवडणुका सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी सर्वच ठिकाणी सक्षम उमेदवार दिले आहेत. परंतु कोपरगाव शहराच्या विकासाला अधिकची चालना मिळावी यासाठी स्वत:कडे असलेले कोपरगाव शहराच्या विकासाचे व्हिजन पूर्ण होवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आशुतोषने सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या रूपाने नगराध्यक्षपदासाठी आतिशय चांगला उमेदवार दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे त्यांनी कौतुक केले. कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न आशुतोष नेहमी सोडवण्याचा प्रयत्न करीत आला आहे. हक्काने माझ्याकडे कोपरगावच्या समस्या मांडतो आणि समस्या सोडवून घेतो. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारचे आणि विशेष माझे पाठबळ कायम त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे काका कोयटे यांना तरुण, तडफदार व व्हिजनरी नेतृत्व असणाऱ्या आ.आशुतोष काळे यांची साथ आणि माजी आमदार अशोकराव काळे यांचे मार्गदर्शन असल्यामुळे कोपरगावचा विकास अधिक वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला.
कोणत्याही समस्येवर युद्ध व आतंकवाद हा उपाय नाही – सिनेअभिनेते मुकेश खन्ना
कोपरगावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत काय करायचे,त्यानंतर एक वर्षात कोणती विकास कामे हाती घ्यायची व पाच वर्षांनंतर काय विकासकामे करायची याचे व्हिजन कोपरगावकरांपुढे ठेवले आहे अशा व्हिजन डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून उद्याचे आधुनिक,प्रगत, सक्षम कोपरगाव उभे करण्याचा ठोस संकल्प राष्ट्रवादी कॉंग्रेसने पूर्ण करण्याचा निर्धार केलेला आहे. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या, आशुतोषच्या मार्गदर्शनाखाली काका कोयटे कोपरगावचा चेहरा मोहरा बदलवून दाखवतील अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.
