Download App

Sanjay Raut : ‘एक महिन्याचा वेळ देतो, 9 चा भोंगा बंद करा’; संजय राऊतांना धमकी

Sanjay Raut News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जिवे मारण्याच्या धमकीची घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि त्यांचे बंधू सुनील राऊत (Sunil Raut) यांनाही धमकी देण्यात आली आहे. खासदार संजय राऊत आणि सुनील राऊत यांना धमकीचा फोन आल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली आहे.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करावा, त्यासाठी एक महिन्याचा वेळ देत असल्याचे या फोनवर सांगण्यात आले आहे. हा फोन सुनील राऊत यांच्या फोनवर आला. संबंधित व्यक्ती हिंदी भाषेत बोल असल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये संबंधित व्यक्ती सातत्याने सकाळी नऊ वाजताचा भोंगा बंद करा, अस इशारा देत होता.

मोठी बातमी! ‘तुमचाही दाभोलकर होणार’; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, संजय राऊत यांना याआधीही धमक्या देण्यात आल्या होत्या. या प्रकरणात पुणे गुन्हे शाखेने एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा दोन महिन्यांनंतर धमकी आल्याने खळबळ उडाली आहे.

शरद पवार यांनाही धमकी

दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही ट्विटरद्वारे धमकी देण्यात आली. या प्रकारावरून राज्यातील राजकारण तापले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी तत्काळ मुंबई पोलीस आयुक्तांची भेट देत धमकीचे ट्विट करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला व्हॉट्सअॅपवरुन हा एक मेसेज आला. कोणत्या तरी एक वेबासाईटवरुन धमकी देण्यात येत आहे. त्याचे फॉलोअर्स जे आहे ते देखील वाईट पद्धतीच्या कमेंट यावर करत आहे, असे त्या म्हणाल्या. तुमचाही दाभोलकर होणार, असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर अनेकांनी अश्लाघ्य भाषेत शिवीगाळ देखील केली आहे.

 

Tags

follow us