Download App

संजय राऊतांचा नार्वेकरांवर गंभीर आरोप; म्हणाले, त्यांच्याकडून आम्हाला न्यायाची..

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने (Maharashtra Political Crisis) निकाल दिला आहे. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे. यावरून राजकारण सुरू झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर घणाघाती टीका केली. राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरही कोरडे ओढले.

राऊत म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे. त्यांच्याकडून न्यायाची आम्ही अपेक्षाच करत नाही. आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन करा असे त्यांना सांगत आहोत. कारण आता या मुद्द्यावर वेळ काढून चालणार नाही. राहुल नार्वेकर यांचा पक्षांतर हा छंद आहे. पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करत नाही. राहुल नार्वेकर सध्या शिवसेनेचे 16 आमदार अपात्र कसे होतील यावर लंडनमधून प्रवचन देत आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.

सीबीआयकडून समीर वानखेडेंच्या घरी छापेमारी; वानखडे म्हणाले, ‘देशभक्त असल्याची….’

इथं भारतीय संविधान आहे विसरू नका

नार्वेकर म्हणतात, आम्हाला निर्णय घ्यायला अमर्याद वेळ आहे. या देशाच्या न्यायव्यवस्थेत कायद्याच्या चौकटीत राहून न्याय द्यावा लागतो. तसेच त्याला वेळेच बंधनही असते. इथं ब्रिटिशांचा कायदा चालत नाही. हे भारतीय संविधान आहे हे लक्षात घ्यावं.

अभी पुरा देश बाकी हैं

ते पुढे म्हणाले, कर्नाटक तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है असं म्हणण्यापेक्षा कर्नाटक तो झाकी है, पुरा देश अभी बाकी है असं म्हटलं पाहिजे. आम्ही 2024 ची तयारी करत आहोत. महाराष्ट्र तर भाजपने लुटलेलं राज्य आहे. ही लूट आहे, ही नैतिकता नाही. त्यामुळे लुटीचं राज्य भाजपकडे फार काळ टिकणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला.

महाराष्ट्रातले मंत्री कमिशनखोर, खासदार इम्तियाज जलील यांच्या आरोपाने खळबळ

गुन्हेगार, भ्रष्टाचाऱ्यांना गृहमंत्र्यांचे अभय

हे एक लाख सांगत आहेत मी पाच लाख सांगत आहेत देश लुटणाऱ्या राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या फायली मी ईडीकडे पाठविल्या आहेत सीबीआयकडे पाठविल्या आहेत. जे बंड होते ते बंडोबा थंडोबा झाले. आणि पुढील तीन महिन्यांमध्ये हे बंडोबा पूर्ण थंड होतील. त्यांना खात्री झाली असेल की त्या बंडोबाचे गंडोबा झालेलं आहे.

भाजपच्या अनेक भ्रष्ट नेत्यांवर कारवाई झाली तर मी पाच लाख देतो. या राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचारांना गुन्हेगारांना कसे पाठीशी घालत आहेत हे मला दाखवायचं आहे. 2024 मध्ये जेव्हा सरकार बदललेलं असेल तेव्हा या सगळ्या कार्यवाही पुढे जातील, असा इशारा राऊत यांनी दिला.

Tags

follow us