Download App

शिवसेना फोडली, धनुष्यबाण गद्दार गटाला दिला तरीही भीती, ‘ये डर अच्छा है’; राऊतांचा शाहांवर हल्लाबोल

Sanjay Raut replies Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) काल नांदेड दौऱ्यावर होते. काल येथे त्यांनी जाहीर सभा घेत लोकसभा निवडणुकांच्या भारतीय जनता पार्टीच्या अभियानाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान देत रोखठोक सवाल केले. या प्रश्नांवर ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असेही सांगितले. त्यांच्या या भाषणावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शाहा यांच्यावर टीका केली.

राऊत म्हणाले, गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड येथील भाषण निवांत ऐका, मजेशीर आहे. त्याच्या भाषणाचा व्हिडीओ राऊत यांनी ट्विट केला आहे. गृहमंत्री अमित शाह यांचे नांदेड येथील भाषण निवांच ऐका. मजेशीर आहे. मला प्रश्न पडला आहे, हे भाजपाचे महासंपर्क अभियान होते की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे खास आयोजन.

अमितभाई यांच्या भाषणातील 20 मिनिटांत 7 मिनिटे उद्धवजी यांच्यावर. म्हणजे अजून मातोश्रीचा धसका अजूनही कायम. शिवसेना फोडली. नाव आणि धनुष्यबाण गद्दार गटास लबाडी करून दिले, तरी देखील डोक्यात ठाकरे आणि शिवसेनेचे भय कायम आहे. ये डर अच्छा है. जे प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारले, त्यावर खरे तर भाजपने चिंतन करायला हवे. पण, ते स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात स्वतःच अडकले. एवढा धसका घेतलाय. असे राऊत म्हणाले.

धोका कुणी दिला?

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप शाह यांनी केला होता. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना राऊत म्हणाले, ठाकरेंच्या शब्दावर विश्वास ठेवतो. आजही राज्यातील साडे अकरा कोटी जनतेचा ठाकरेंच्या शब्दावर विश्वास आहे. बाहेरच्यांवर नाही.

भाजपबरोबर आता राहिलंय तरी कोण, जे त्यांच्याबरोबर होते ते आता त्यांच्याबरोबर नाहीत. 2024 मध्ये आता त्यांना कळेल की कोण होते म्हणून ते जिंकले होते. वाघाचे कातडे घालून कोल्हे-लांडगे फिरत आहेत. खरा वाघ समोर आला की काय अवस्था होईल हे लवकरच दिसेल. धोका कुणी दिला याचे उदाहरण म्हणजे आजचे सरकार आहे, असे राऊत म्हणाले.

कर्जत बाजार समितीच्या सभापतीची आज निवड, रोहित पवारांकडे की राम शिंदेंकडे जाणार सत्ता?

काय म्हणाले होते शाह?

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार बनलं आहे. धनुष्यबाणही सेनेला मिळाला आहे. त्यामुळे खरी शिवसेना कोणती हे निश्चित झालं आहे. हे राज्यातील जनतेला सांगण्यासाठी आलोय की मी भाजपाचा अध्यक्ष होतो. मी आणि फडणवीस बोलणी करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी ठाकरे म्हणाले होते की जर बहुमत एनडीएला मिळालं तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण, निकाल आल्यानंतर त्यांनी शब्द पाळला नाही. सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले.

 

Tags

follow us