Maharashtra Self Redevelopment Authority: भाजपचे विधानपरिषद सदस्य प्रवीण दरेकरांना (Pravin Darekar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिवाळीपूर्वीच मोठे गिफ्ट दिले आहे. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचे स्वयंपुनर्विकास करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना (Maharashtra Self Redevelopment Authority) करण्यात आलीय. प्राधिकरणाचे पहिले अध्यक्ष प्रवीण दरेकर हे असणार आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा ! पूरपरिस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
विशेष म्हणजे दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने अशा प्राधिकरणाची शिफारस केली होती. या प्राधिकरणाला मंत्रिपदाचा दर्जा आहे. राज्य सरकारने याबाबत शासन निर्णय सोमवारीच जाहीर केलाय. राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या स्वंय, समूह पुनर्विकासाकरिता स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलीय. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकरांची वर्णीही लावण्यात आलीय. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा असणार आहे. त्यांना वेतन, भत्ते सुविधा म्हाडा प्राधिकरणामार्फत दिले जाणार आहे. या प्राधिकरणाकरिता नोडल एजन्सी म्हणून म्हाडा प्राधिकरण कामकाज पाहणार आहे. या प्राधिकरणासाठी कार्यालयाची जागा, कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही म्हाडाकडून केली जाणार आहे. (Maharashtra Self Redevelopment Authority first chairman Pravin
Darekar)
मराठवाड्यात अतिवृष्टीचा झाला अतिरेक! तब्बल 104 जणांचा घेतला बळी, वाचा सविस्तर अहवाल
सहा वर्षांपूर्वी नेमला होता अभ्यासगट
नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतीचे स्वयंपुनर्विकास करण्यासाकरिता प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून 2019 ला अभ्यासगट नेमला होता. या अभ्यासगटाचे प्रमुख प्रवीण दरेकर हे होते. या अभ्यासगटाने दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे अहवाल सादर केला होता. या अभ्यासगटाने सादर केलेल्या शिफारशींच्या प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता स्वयं पुनर्विकास प्राधिकरण स्थापनाचा निर्णय फडणवीसांनी घेतला आहे.