Download App

नवर्षापासून बस प्रवाशांच्या मोबाईलवर लोकेशन दिसणार; स्थानकावर ताटकळत थांबण्याचा त्रास वाचणार

रेल्वे, मेट्रो असो की अन्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घरबसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

  • Written By: Last Updated:

GPS To Installed In ST Buses : एसटी बसमधून पुणे, मुंबई किंवा अन्य दूरच्या ठिकाणावरून कुणी नातेवाईक येत आहेत, पण त्यांचा फोन लागत नाही. त्यांना त्या मार्गाची फार माहिती नाही, ते कुठपर्यंत आले असतील, ही चिंता आता प्रत्येकाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ‘व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम’द्वारे दूर होणार आहे. (Bus) बसची वाट पाहात तासन्‌तास बस स्थानकावर देखील थांबावं लागणार नाही. कोणत्या मार्गावरील, कोणती एसटी बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, याची माहिती आता त्या ॲपद्वारे घरबसल्या मिळणार आहे.

बस स्थानकांचा कायापालट होणार; महामंडळासोबत 600 कोटींचा सामंजस्य करार

रेल्वे, मेट्रो असो की अन्य खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे लोकेशन घरबसल्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण, सामान्यांना त्यांची लालपरी कोठे आहे, कधीपर्यंत स्थानकावर येईल, या प्रश्नांची उत्तरे मिळत नव्हती. त्यावर आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने उपाय शोधला असून त्याची स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केली जात आहे. आतापर्यंत महामंडळाच्या ताफ्यातील दहा हजार बसगाड्यांना ‘जीपीएस’ सिस्टिम बसवण्यात आली आहे. आता, त्या यंत्रेणीची सद्य:स्थिती काय, याची पडताळणी केली जात आहे.

एसटी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा काही अडचणीमुळे वेळेनुसार बस स्थानकावर पोचायला विलंब होत असल्यास त्याची माहिती देखील त्या ॲपद्वारे समजणार आहे. अनधिकृतपणे बस कुठं थांबवली जाते का किंवा ज्या ठिकाणी थांबा आहे तेथे नियोजित वेळेपेक्षा जास्तवेळ बस थांबविली जातेय का, याची देखील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजेल. एकूणच या यंत्रणेमुळे लालपरीच्या वेळापत्रकात सूसूत्रता येणार असून, प्रवाशांनाही बसगाड्यांच्या वेळेचा भरोसा मिळणार आहे.

व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिमची वैशिष्टे काय ?

ॲन्ड्राईड मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करावे लागणार महामंडळाचे एमएसआरटीसी ॲप

महामंडळाची प्रत्येक बस कुठून किती वाजता निघेल व कधीपर्यंत नियोजित ठिकाणी पोचेल ॲपवरुन समजणार

गुगल मॅपवरुन समजणार बस कधीपर्यंत स्थानकावर येईल, त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागणार नाही

हात करूनही बस थांबली नाही, प्रवाशाने केलेल्या या तक्रारीची ॲपवरुन होईल खात्री

एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या नातेवाइकांचीही दूर होणार चिंता, त्यांनाही येणार वेळेचा अंदाज

follow us