बस स्थानकांचा कायापालट होणार; महामंडळासोबत 600 कोटींचा सामंजस्य करार

बस स्थानकांचा कायापालट होणार; महामंडळासोबत 600 कोटींचा सामंजस्य करार

ST Station : राज्यातील एसटी बस स्थानकांच्या (ST) विकासासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) एक पाऊल पुढे टाकले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत एसटी महामंडळ आणि एमआयडीसीमध्ये (MIDC) 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील एसटी बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.

Parliament winter session : चार दिवसांत तब्बल 92 खासदारांचे निलंबन; विरोधकांची नेमकी मागणी काय?

एसटी महामंडळाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एसटी महामंडळासाठी आर्थिक मदत करावी, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानूसार पहिल्या टप्प्यात राज्यातील 193 एसटी बसस्थानकासाठी कॉंक्रिटीकरणासाठी 500 कोटी रुपये तर रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्तीसाठी 100 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया एमआयडीसीकडून राबविण्यात येणार आहे.

Advance Booking: किंग खानचा ‘डंकी’ तर प्रभासच्या ‘सालार’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये ‘काटे की टक्कर’

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत राज्यातील 193 बसस्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभिकरण होणार आहे. यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळात 600 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. या निधीतून आता सर्व बसस्थानकांचा कायापालट होणार आहे. एमआयडीसीच्या या पुढाकाराचे मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक केले आहे.

नागपूर-अमरावती महामार्गावर अपघात, CM शिंदेंनी ताफा थांबवत जखमींना नेलं रूग्णालयात

दरम्यान, राज्यातील एसटी बसस्थानकांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याची परिस्थिती आहे. राज्यभरात एसटीची 609 बसस्थानके आहेत. त्यापैकी सध्या 536 बसस्थानके कार्यरत आहेत. बसस्थानक परिसरातील खड्डे, पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल, यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो. यामध्ये एसटी बसेसचे देखील नुकसान होते. यावर कायमचा उपाय म्हणून एमआयडीसीकडून हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube