फडणवीसांनी पुन्हा आळवला त्यागाचा सूर; भर कार्यकारिणीत इच्छुकांचे चेहरे पडले पांढरे

पुणे प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी ) भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. नाशिक प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. नाशिक मध्ये देखील फडणवीस यांनी कार्यलर्त्यांनी काही मागू नये, त्याग करण्याची तयारी ठेवा, मंत्री पद मागू नका. अस आवाहन केल . तेच आवाहन फडणवीस यांनी पुण्याच्या कार्यकारिणी मध्ये केलं. व्यासपीठावरून फडणवीस यांनी पद […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 18T173001.368

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 18T173001.368

पुणे प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी )

भारतीय जनता पार्टीची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. नाशिक प्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. नाशिक मध्ये देखील फडणवीस यांनी कार्यलर्त्यांनी काही मागू नये, त्याग करण्याची तयारी ठेवा, मंत्री पद मागू नका. अस आवाहन केल . तेच आवाहन फडणवीस यांनी पुण्याच्या कार्यकारिणी मध्ये केलं.

व्यासपीठावरून फडणवीस यांनी पद मागू नका, महामंडळ मागू नका अस बोलताच पत्रकार बैठक शेजारी बसलेला एक पदाधिकारी पुटपुटला, “द्यायला पाहिजे हो खूपच पिचलो आहे हो” अस बोलून सर्वांच वेढून घेतले. फडणवीस यांनी मंत्रिपद मिळणार नाही या विधानावर अनेकांनी हात वर केले नाही. यावर देवेंद्र फडणवीस यांनी सावरत आमदारांना हे आवडलेल दिसल नाही अस म्हणत हशा पिकवला. त्याच वेळी काही जण खाली पुटपुटले अनेक जणांकडे तीन तीन चार चार मंत्रिपद आहेत ते तरी वाटा अस सांगत हिरमुसून बोलला.

Pune BJP State Executive Meeting : कसलीही अपेक्षा करू नका; मंत्रिपद मागणाऱ्यांना फडणवीसांनी दिला थेट इशारा

सध्या या सरकारचे एक दीड वर्ष उरला आहे. अनेकाण मंत्रिपद आणि विविध महामंडळ यांची आस लागली आहे. गेले तीन वर्ष पदाची आशा लागलेल्या कार्यकर्त्यांना थेट कामाला लागा असं सांगितलायने या विधानाची चांगलीच खसखस पिकली होती. जाता जाता देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा त्यागाची आठवण करुन दिली. यानंतर सभागृहात काहीशी शांतता पसरली.

Pune BJP State Executive Meeting : कसलीही अपेक्षा करू नका; मंत्रिपद मागणाऱ्यांना फडणवीसांनी दिला थेट इशारा

दरम्यान, कार्यकारिणीच्या या बैठकीत केंद्रीय पदाधिकारी , सुधीर मुनगंटीवार , प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस आणि जे पी नड्डा वगळता कुणालाही बोलण्याची संधी मिळाली नाही. या बैठकीत ३० मे पासून ३० जुन पर्यंत बूथ रचना कशी असावी त्याना कस ऍक्टीव्ह करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .

Exit mobile version