महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव नसल्याची माहिती समोर आली आहे.
लाचारांची स्वारी सिल्व्हर ओकच्या दारी; शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना ललकारलं
दरम्यान, तुर्तास जरी अजित पवारांनी दिलासा मिळाला असला तरी पुढील चौकशीअंती अजित पवारांचं नाव येण्याची शक्यता असल्याचं ईडीच्या सुत्रांकडून सांगण्यात आलंय.
Nana Patekar : मी नसिरुद्दीन शाहसाठी नवस केला… अन, माझा देवावरचा विश्वास उडाला!
ईडीने न्यायालयात राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी अद्याप कोणत्याही स्वरुपात दखल घेतलेली नसून या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 एप्रिल रोजी होणार आहे. यासंदर्भात अद्याप ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.
अमित शाहांनी केली मोठी भविष्यवाणी; सांगितलं किती जागा जिंकत मोदी होणार तिसऱ्यांदा PM
ईडीचा आरोप :
जरंडेश्वर साखर कारखान्याची एकूण 65 कोटींची संपत्ती सध्या गुरू कमोडिटी सर्व्हिसेसच्या नावावर असून जरंडेश्वर शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेडला लीजवर आहे.
‘दोनच पेपर दिले तर गुणपत्रिका नापासचीच येणार’ ; मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीला खोचक टोला
या कारखान्याचा लिलाव कमी किंमतीत झाला आहे. स्पार्कलिंग सॉईल ही अजित पवार आणि सुनेत्रा अजित पवार यांच्याशी संबंधित कंपनी असल्याचे तपासात समोर आले आहे. मिलचा वापर केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.
दरम्यान, जुलै 2021 मध्ये ईडीकडून कारखान्याची 65 कोटींची जमीन, इमारतीसह इतर मालमत्ता जप्त करण्यात आली होती. दरम्यान, या कारखान्याच्या नावे नव्याने घेतलेले कर्ज हे संशयाच्या भोवऱ्यात अडकले असून ज्या बँकानी कर्ज दिले त्या बँकावर वर्चस्व हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे होते.