Download App

‘हे तर गृहमंत्रालयाचं मोठं अपयश’; कोल्हापुरातील घटनेवरून सुप्रिया सुळे संतापल्या

Supriya Sule : राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काल नगरची घटना झाली आज कोल्हापुरात होतंय. जेव्हापासून महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. सारखंच असं वातावरण दुषित कसं होत आहे. काल नगरची घटना झाली आता कोल्हापुरला होतंय. राज्यात सातत्याने तणावाचं वातावरण कसं होतं. या अशाच गोष्टी जर होत राहिल्या तर त्यात राज्याचं नुकसान होणार आहे. लोकं गुंतवणूक करणार नाहीत. सर्वसामान्य जनताही सध्या घाबरलेली आहे त्यामुळे हे गृहमंत्रालयाचं अपयश आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या कारभारावर हल्लाबोल केला.

आज खासदार सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी कोल्हापुरातील परिस्थिती, मुंबई येथील घटना यावर प्रश्न विचारले. त्यावर प्रतिक्रिया देत सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्या गृहमंत्रालयाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले. सुळे म्हणाल्या, राज्यात जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आली आहे. सारखी तणावाची परिस्थिती का निर्माण होत आहे. अशा गोष्टी सातत्याने घडत राहिल्या तर त्यात राज्याचेच नुकसान होणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

‘पवार साहेबांचे डायलॉग सेम, त्यांची स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत’; फडणवीसांचा खोचक टोला

आज मुंबईत जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल राज्य आणि केंद्र सरकार गंभीर नाही. हे दुर्दैव आहे. जिथे मुलींचे होस्टेल आहेत तेथे सुरक्षिततेला प्राधान्य दिलेच पाहिजे, असे मत सुळे यांनी व्यक्त केले.

यानंतर त्यांनी केंद्र सरकारच्या कारभारावरही जोरदार टीका केली. कांद्याचे भाव पडले होते. त्यावेळी केंद्राने निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र,  केंद्र सरकारने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही असे सुळे म्हणाल्या.

यांचे सरकार आले अन् दंगे वाढले 

गृहविभागाचा इंटेलिजन्स विभाग असतो. हा विभाग गृहमंत्रालयाला अहवाल देत असतो. यात नक्कीच काहीतरी गडबड होत आहे. यांचा इंटेलिजन्स विभागाने गृहमंत्रालयाला इशारा दिला पण, गृहविभागाने पुढे काहीच कार्यवाही केली नाही. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षांवर आरोप करू शकत नाही. गृह मंत्रालय स्वतःच्या जबाबदारीतून पळ काढत आहे. यांचा इंटेलिजन्स विभागाचा रिपोर्ट यांना काही माहिती देत नाही का. जसे यांचे सरकार आले आहे दंगेच होत आहेत. याआधी कधीही इतक्या दंगली झाल्या नाहीत. त्यामुळे हे सगळे गृहमंत्रालयाचेच अपयश आहे.

Tags

follow us