Download App

धक्कादायक! ठाण्यातील रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू; उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

Thane Kalwa Hospital News : ठाणे शहरातील कळवा येथील महापालिकेच्या रुग्णालयातील पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने मात्र हा आरोप नाकारला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची माहिती त्यांनी घेतली. तसेच या धक्कादायक घटनेवर संताप व्यक्त केला.

रुग्णालयात आज दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली. रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरच याला कारणीभूत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. हे सर्व रुग्ण गंभीर अवस्थेतच दवाखान्यात आले होते. हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि यंत्रणेने त्यांच्यावर उपचार केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती रुग्णालयातच अधिष्ठात्यांनी दिली.

Pune News : दोघांकडे बॉम्बसदृश्य वस्तू? पोलिसांनी घेतले ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच मनसे आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कार्यकर्ते रुग्णालयाबाहेर जमा झाले. तसेच आमदार जितेंद्र आव्हाडही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेची माहिती घेतली. रुग्णालय प्रशासनालाही त्यांनी चांगलेच धारेवर धरले. या घटनेबाबत ट्विट करून त्यांनी संताप व्यक्त केला.

गेले अनेक दिवस रुग्णालयाबाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या. आज एका महिलेचा फोन आला की तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत. परंतु, रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाही. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालया गेलो असता रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो. तळपायाची आग मस्तकात गेली, असं ट्विट आव्हाडांनी केलं.

Earthquake : तु्र्कस्तानात पुन्हा शक्तिशाली भूकंप; पळापळीत अनेकजण जखमी, अंदमानही हादरलं!

रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे काय ?

रुग्णालयात रुग्णांची काळजी घेतली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी अनिरुद्ध माळगावक यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले की हे रुग्ण दाखल झाले त्याचवेळी गंभीर अवस्थेत होते. पहिला रुग्ण दारुच्या आहारी गेलेला होता. त्याने श्वासनलिकेत उलटी केली. दुसरा पेशंट हा हृदयविकार येऊन तिसऱ्या स्टेजमध्ये होता. लोकांना खासगी दवाखान्यात उपचार परवडत नाहीत. आम्ही येथे रात्रंदिवस काम करतोय. दोन तीन दिवस खासगी दवाखान्यात ठेऊन पुन्हा इकडे येतात. येथे आम्ही त्यांच्यावर उपचार करतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. यातील तीन पेशंट खरंच अत्यवस्थ होते, अशी माहिती दिली.

Tags

follow us