Earthquake : तु्र्कस्तानात पुन्हा शक्तिशाली भूकंप; पळापळीत अनेकजण जखमी, अंदमानही हादरलं!

Earthquake : तु्र्कस्तानात पुन्हा शक्तिशाली भूकंप; पळापळीत अनेकजण जखमी, अंदमानही हादरलं!

Earthquake : सध्या भूकंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन देशांनाही भूकंपाचा धक्का बसला होता. काल हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात मोठा भूकंप झाला. त्यानंतर गुरुवारी रात्री तुर्कस्तानच्या दक्षिण भागात शक्तिशाला भूकंप झाला.

भूकंप इतका जोरदार होता की यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले. 23 लोक जखमी झाले. भूकंपाचा केंद्रबिंदू मालत्या प्रांतातील येसिलर्ट शहरात होता. 5.2 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता.

या व्यतिरिक्त आदियन प्रांतातही भूकंपाचे धक्के जाणवले. या दोन्ही प्रांतात फेब्रुवारी महिन्यात विनाशकारी भूकंप झाला होता. या भूकंपात 50 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. काल रात्री झालेल्या भुकंपात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जपानमधील होक्काइडो भागात देखील 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला, अशी माहिती जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेसने दिली.

भारतातही मागील काही दिवसांपासून अनेक प्रांतात भूकंपाच्या घटना घडल्या आहेत. काल हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात भूकंप झाला. त्यानंतर गुरुवारी रात्री अंदमान निकोबार बेटांवरही भूकंप झाला. 4.3 तीव्रतेचा हा भूकंप होता. अंदमानात मागील पंधरा दिवसांपुर्वीही भूकंपाचे धक्के बसले होते. नॅशनल सेंटक फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार पहाटे 2.56 वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या आत फक्त 10 किलोमीटर खोलीवर होता.

दिल्लीत मोठ्या भूकंपाचा धोका का?

दिल्लीत मोठा भूकंप होण्याची शक्यता बऱ्याच दिवसांपासून वर्तवली जात आहे. राजधानीत मोठ्या तीव्रतेचा भूकंप होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. वास्तविक दिल्ली हे भूकंपाच्या झोनपैकी झोन ​​4 मध्ये आहे. देश अशा चार झोनमध्ये विभागलेला आहे. झोन-4 मध्ये असल्याने दिल्ली भूकंपाचे जोरदार धक्केही सहन करू शकत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube