Maharashtra Unseasonal Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखील मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवल्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
त्यामध्ये राज्यात हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील चार दिवस राज्यासाठी अतिमहत्त्वाचे असणार आहे. कारण वादळी वाऱ्यासह तीव्र पाऊस राज्यात थैमान घालणार आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची ही शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
या हवामाम बदलामागे आणि पावसाच्या मागे एक कारण देखील भारतीय हवामान विभागाने सांगितलं आहे. हवामान विभागाने सांगितल्यानुसार बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचं सावट पुन्हा पुन्हा निर्माण होत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र सपाटीपासून 105 किमी उंचीपर्यंत चक्राकतार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील काही भागांना अलर्ट देखील जारी केला आहे. तर आज राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळघार पावसाची शक्याता आहे. तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain : राज्यात अवकाळीने पिकांचं मोठं नुकसान, बळीराजाचा पाय खोलात
मध्य महाराष्ट्रतील नाशिक, नगर, पुणे, सातारा तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी हिंगोली त्याचबरोबर विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वाशिम यावतमाळ या जिल्ह्यांना गारपीटीचा आणि वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकदे पालघर, ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी, नंदूरबार, धुळे, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, धराशिव, लातूर, नांदेड, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना गारपीटीचा आणि वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.