Download App

महायुतीचं ठरलं, 225 जागांवर एकमत, ‘या’ दिवशी होणार घोषणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर पुन्हा एकदा महायुती

  • Written By: Last Updated:

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : येत्या काही दिवसात राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. लोकसभेनंतर पुन्हा एकदा महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) मुख्य लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा देखील सुरु झाली आहे.

यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, सत्ताधारी महायुतीमध्ये जवळपास 225 जागांवर एकमत झाले आहे. तर उरलेल्या जागांसाठी आज रात्री किंवा उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार असल्याची माहिती समोर येत आहे. माहितीनुसार, महायुती 5 ऑक्टोबरपर्यंत जागावाटपाबात निर्णय घेणार आहे. त्यामुळे आता कोणत्या पक्षाच्या वाटेला कोणता मतदारसंघ येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये देखील पुढील काही दिवसात जागावाटपाबाबत निर्णय होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँगेस( शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपसह (BJP) महायुतीला धक्का देत 48 पैकी 31 जागांवर विजय मिळवला होता तर महायुतीला अवघ्या 19 जागांवर विजय मिळवता आला होता.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांना प्रचारासाठी जास्त वेळ मिळवा यासाठी जागावाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी महायुतीच्या आमदारांनी काही दिवसापूर्वी केली होती. या मागणीचा विचार करून लवकरात लवकर जागावाटपाबाबात निर्णय घेण्यात यावा अशी भूमिका महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतली आहे.

सिनेट निवडणुकीत युवासेनेने मारली बाजी, ABVP ला धक्का, जाणून घ्या निकाल

गेल्या काही दिवसांपासुन महायुतीमध्ये मतभेद होत असल्याने अजित पवार महायुतीमधून बाहेर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे मात्र आता महायुतीमध्ये जवळपास 225 जागांवर एकमत झाले असल्याची माहिती समोर येत असल्याने अजित पवार महायुती सोडणार नाही हे जवळपास निश्चित झालं आहे अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

follow us