Download App

पुढील 3 दिवस धोक्याचे! राज्यात धो-धो पाऊस; IMD चा इशारा, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

  • Written By: Last Updated:

Maharashtra Weather Update IMD Issue Rain Alert : सप्टेंबर महिन्यात कोकणात (Maharashtra Weather Update) सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला (Rain Alert) होता. मात्र, पहिल्याच आठवड्यात हवामान खात्याने (IMD) अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. सप्टेंबर महिन्यात कोकणात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असली तरी, महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

कोकणात सतर्कता

दक्षिण कोकण : मंगळवारी यलो अलर्ट, तर बुधवार आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट.
उत्तर कोकण : गुरुवारी पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता; त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी.
रायगड : बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार सलग तीन दिवस ऑरेंज अलर्ट.
रत्नागिरी : बुधवार आणि गुरुवारी ऑरेंज अलर्ट.
सिंधुदुर्ग : बुधवारी ऑरेंज अलर्ट, तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाचा अंदाज.

मराठा आरक्षणाचा पेच सुटणार? सरकारच्या गोटात ‘या’ चार पर्यायांची चर्चा, अंतिम तोडगा कोणत्या मार्गाने

मुंबईत परिस्थिती

मुंबईत तुलनेने पावसाचा वेग कमी राहणार आहे. बुधवारी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे, तर गुरुवार आणि शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त झाली आहे. मात्र, मुंबईला अद्याप ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

उत्तर मध्य महाराष्ट्र

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत मंगळवार ते गुरुवार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. घाट परिसरात मात्र पावसाचा जोर अधिक राहणार आहे.

पुणे घाट परिसर : बुधवार ते शुक्रवार ऑरेंज अलर्ट.
नाशिक घाट परिसर : गुरुवारी ऑरेंज अलर्ट.
कोल्हापूर व सातारा घाट परिसर : बुधवार आणि गुरुवार ऑरेंज अलर्ट.

…आम्हाला याची लाज वाटतीये; मराठा बांधवांचं मुंबईत आंदोलन, भाजप नेते दरेकर का संतापले?

मराठवाडा

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासोबतच मराठवाड्यातही पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पाऊस राहणार असून, यासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

शेतकरी आणि नागरिकांसाठी सूचना

मुसळधार पावसामुळे नद्या-ओढ्यांमध्ये पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगावी.
शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी तातडीचे उपाय करावेत.
डोंगराळ व घाटमाथा परिसरात भूस्खलनाचा धोका संभवतो, त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळावा.

 

follow us