Download App

पाऊस आज पुन्हा पुणेकरांची दाणादाण उडवणार; वाचा कोसळणाऱ्या सरींचा नेमका अंदाज काय?

काल पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली गेली.

Maharashtra weather update : राज्यभरात अनेक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. काल मुंबईसह पुण्यात (Pune Rain) विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. पुण्यातील अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. दरम्यान, आज पुन्हा एकदा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली गेली.

ज्याची भीती होती तेच घडलं! CPEC प्रोजेक्ट थेट अफगाणिस्तानात नेणार ड्रॅगन, भारताला धोक्याची घंटा 

हवामान विभागाने आज (मंगळवार, २१ मे) पुढच्या चार तासात कोकण, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला. तर काही भागात अतिमुसळधार पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा दिला. तर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. सायंकाळी मुसळधार सरींची शक्यता असल्यानं प्रशासन आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलंय.

तर गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम संततधार पावसाचा इशारा देण्यात आला.

विधानसभा निवडणुकीत प्रतिसाद का मिळाला नाही? …मनोज जरांगेंनी आत्मचिंतन करावं, लक्ष्मण हाकेंचा सल्ला 

पुणे शहरात ढगाळ वातावरण

आज सकाळपासून पुणे शहरात ढगाळ वातावरण आहे. हवा दमट असून, वातावरणात उकाडा जाणवत आहे. सायंकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यंत आवश्यक नसल्यास, विशेषतः संध्याकाळी घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आलंय. या पावसामुळे शहरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळं नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.

अरबी समुद्रात बुधवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन पुढील २ दिवसांत त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. पुढील ३-४ दिवस कोकण, मध्यमहाराष्ट्रामध्ये वेगवान वाऱ्यांसह पावसाच्या जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली.

कोकण किनारपट्टीवर वादळसदृश परिस्थिती
दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा तयार झाल्यानं कोकण किनार पट्टीवर वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पुढील दोन दिवसांत ३५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाने किनाऱ्यालगत असलेल्या मच्छिमारांना सतर्कतेचा तसेच समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे, मच्छिमारांनी पुढील दोन दिवस त्यांच्या नौका सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे आव्हान देखील करण्यात आलं.

follow us