Download App

Maharashtra Day : महाराष्ट्र 58 जिल्ह्यांचा होणार? जाणून घ्या प्रस्तावित जिल्ह्यांविषयी सविस्तर…

Maharashtra will have fifty eighth districts : आज महाराष्ट्र दिन आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या मागणीसाठी मराठी लोकांनी लढा उभारला होता. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोठा संघर्ष झाला होता. स्वतंत्र महाराष्ट्र व्हावं, या आदोलकांच्या मागणीला अखेर यश मिळालं आणि 1 मे 1960 रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले. हा दिवस मराठी माणसाचा आहे. तो मोठ्या प्रमाणात राज्यभर साजरा केला जातो. या दिवशी ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या 106 हुतात्म्यांचे स्मरण आजच्या रोजी केले जाते.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बेळगाव, कारवार, निपाणी हे जिल्हेदेखील महाराष्ट्रात यावे, ही मागणी होताी. मात्र, ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. त्यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे. आजही सीमावासियांना आणि सीमाभागातील खेड्यांना महाराष्ट्रात सहभागी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा संघर्ष आजही सुरु आहे.

मात्र यामध्ये महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या निर्मितीचा इतिहास पाहता भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर राज्यात 26 जिल्हे होते. मात्र कमी जिल्हे असल्याने प्रशासकीय कामात लोकांना मोठ्या अडचणींचा सामना कारावा लागत होता. त्यामुळे राज्यात नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 10 नवीन जिल्ह्यांची भर पडली आहे. आता महाराष्ट्र 36 जिल्ह्यांचा झाला आहे.

असे होते पूर्वीचे महाराष्ट्र
10 जिल्ह्यांचे बॉम्बे स्टेट : तेव्हा खान्देश, नाशिक, पुणे, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग आणि बॉम्बे हे 10 जिल्हे होते.

प्रारंभीचे 26 जिल्हे : ठाणे, कुलाबा (आताचे नाव रायगड), रत्नागिरी, बृहन्मुंबई, नाशिक, धुळे, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, जळगाव, भंडारा, चांदा (आताचे नाव चंद्रपूर) हे 26 जिल्हे नव्याने अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्रात होते.

1981 पासून आतापर्यंत झालेले 10 जिल्हे: रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग, छ. संभाजीनगरमधून जालना, धाराशिवमधून लातूर, चंद्रपूरमधून गडचिरोली, बृहन्मुंबईमधून मुंबई उपनगर, अकोल्यामधून वाशिम, धुळ्यामधून नंदुरबार, परभणीमधून हिंगोली, भंडाऱ्यामधून गोंदिया, ठाण्यामधून पालघर,

महाराष्ट्र दिनानिमित्त हुतात्म्यांना मुख्यमंत्री शिंदेंचे अभिवादन

दरम्यान राज्यात 36 जिल्हे असले तरी देखील आजही जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासकीय काम कारायचे असल्यास नागरिकांना पुर्ण दिवस खर्च करावा लागतो. त्यामुळे राज्यात आणखी 22 जिल्ह्याची निर्मिती व्हावी यासाठी एक मागणी प्रस्तावित आहे.

या जिल्ह्यातून हे जिल्हे शक्य :

नाशिकमध्ये मालेगाव, कळवण दोन जिल्हे निर्माण होऊ शकतात. पालघरमध्ये जव्हार, ठाण्यामध्ये मीरा भाईंदर आणि कल्याण, अहमदनगरमध्ये शिर्डी, संगमनेर आणि श्रीरामपूर, पुण्यात शिवनेरी, रायगडमध्ये महाड, साताऱ्यात माणदेश, रत्नागिरीत मानगड, बीडमध्ये अंबेजोगाई, लातूरमध्ये उदगीर, नांदेडमध्ये किनवट, जळगावमध्ये भुसावळ, बुलडाणामध्ये- खामगाव, अमरावतीमध्ये अचलपूर, यवतमाळमध्ये पुसद, भंडाऱ्यात साकोलीचंद्रपूरमध्ये चिमूर, गडचिरोलीमध्ये अहेरी.

Tags

follow us

वेब स्टोरीज