संभाजी भिडेवर कारवाई का होत नाही? काँग्रेस नेत्यानं दिलं धक्कादायक उत्तर

Prithviraj Chavan : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेस नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, अद्याप भिडेंना अटक झालेली नाही. अमरावतीत […]

Prithviraj Chavan

Prithviraj Chavan

Prithviraj Chavan : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरुच ठेवली आहे. महात्मा गांधी यांच्यानंतर महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यांवर काँग्रेस नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, अद्याप भिडेंना अटक झालेली नाही. अमरावतीत त्यांच्यावर मात्र गुन्हा दाखल झाला आहे. यानंतरही भिडेंवर ठोस कारवाई होत नसल्याने विरोधकांत संताप आहे. विरोधकांकडून आता सरकारवरच गंभीर आरोप केले जात आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले.

क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  भिडेंवर कारवाई झाली नाही तर काँग्रेस पक्ष काय करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चव्हाण म्हणाले, सत्ताधाऱ्यांचा भिडेंना छुपा पाठिंबा आहे. राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य आणि भिडेंनी अमरावतीत केलेलं वक्तव्य याची तुलना करू शकतो का. राहुल गांधींनी कुणाचं नावही घेतलेलं नव्हतं. तरीही त्यांना शिक्षा झाली. त्यांची खासदारकी गेली. राहुल गांधींच्या खटल्यावर तुम्ही इतक्या तातडीने निर्णय घेता, त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावता.

संभाजी भिडेची संघटना नोंदणीकृत नाही

दुसरीकडे भिडेने महात्मा गांधी यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं आहे, महात्मा फुले आणि शिर्डीच्या साईबाबांबद्दल जे वक्तव्य केलं. ते आपण निमूटपणे ऐकून घ्यायचं का? याचा अर्थ एकच आहे तो म्हणजे याला सत्ताधारी भाजपाचा छुपा पाठिंबा आहे. त्याला आर्थिक मदतही दिली जात आहे. त्यामुळेच त्याची संघटना चालली आहे. कशी चालली माहिती नाही. ही संघटना नोंदणीकृत नाही असा माझा स्पष्ट आरोप आहे. जर हा माणूस पैसे गोळा करतोय, वर्गण्या गोळा करतोय तर त्याची चौकशी झाली पाहिजे. हे सगळं माहिती असताना फडणवीसांचं सरकार आणि भाजप या गृहस्थाला संरक्षण देत आहेत असा माझा स्पष्ट आरोप असल्याचे चव्हाण म्हणाले.

बाळासाहेबांचे नावा घेता पण महिलांबद्दल…; राज यांची शिरसाटवर टीका अन् ठाकरे गटाचं समर्थन

अजितदादांना भाजप सरकारची गरज

उपमुख्यमंत्री अजित पवार हे सगळं का सहन करत आहेत या प्रश्नावर चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर देत अजित पवार यांच्यावर टीका केली. आता अजितदादांना किती अधिकार आहेत माहिती नाही. कदाचित त्यांना पद जाण्याची भीती वाटत असावी. निलंबनाचा निर्णय अजून प्रलंबित आहे. त्यामुळे सध्याच्या काळात त्यांना भाजप सरकारची गरज आहे. ते आता काय बोलणार असा खोचक सवाल चव्हाण यांनी केला.

Exit mobile version