बाळासाहेबांचे नावा घेता पण महिलांबद्दल…; राज यांची शिरसाटवर टीका अन् ठाकरे गटाचं समर्थन
Raj Thackery : राज्यातील सत्तासंघर्षानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये अद्यापही चांगलीच धुमश्चक्री पाहायला मिळत आहे. नुकतच शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करीत सडकून टीका केली होती. त्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना त्यांच्या सौंदर्यामुळे खासदारकी मिळाली अशी टीका त्यांच्यावर केली. त्यावरून राज्यातील वातावरण तापले असताना आता राज ठाकरेंनी देखील ठाकरेंच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या समर्थनार्थ संजय शिरसाटांवर चांगलीच टीका केली आहे. ( Raj Thackery criticize Shinde MLA Sanjay Shirsath support Thackery MLA Priyanka Chaturvedi )
संभाजी भिडेंना कॉंग्रेस अन् राष्ट्रवादीने मोठे केले, पण… पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरेंच्या मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत ते म्हणाले की, ‘महाशक्तीने मुकुट चढविलेलं हे ‘शिर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे! प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, “महिलांबद्दलचा जितका आदर मनात साठवीत जाल तितके शिवराय तुमच्यावर अधिक प्रसन्न होत जातील…” त्याच प्रबोधनकार ठाकरेंच्या सुपुत्राचे म्हणजेच स्व. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करायचं आणि महाशक्ती पाठीशी आहे. म्हणून महिलांबद्दलची वाट्टेल ती विधानं करायची हे महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही… अशांचं ‘शीर’ नेत्यांनी जाग्यावर आणावे अन्यथा ते ‘शीर’ विकृत विचारांचं ‘माठ’ आहे. असं महाराष्ट्रात प्रचलित होईल.’ अशी टीका राज ठाकरेंनी केली.
Box Office: ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची घोडदौड सुरुच; 4 दिवसांत 50 कोटींचा आकडा पार
काय आहे नेमकं प्रकरणं?
ठाण्यात हिंदीभाषिक कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी(Priyanka Chaturvedi) यांनी शिंदे गटातल्या आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करीत सडकून टीका केली होती. त्यावरुन संजय शिरसाटांनीही खासदार चतुर्वेदी यांना खासदारकी कशी मिळाली? त्याबद्दल थेट भाष्य करीत जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर आता खासदार चतुर्वेदी यांनीही ट्विटरद्वारे शिरसाटांना खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे? हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नसल्याचा टोलाच चतुर्वेदी यांनी शिरसाटांना लगावला. त्यात आता ठाकरेंच्या खासदाचं थेट राज ठाकरे यांनीच समर्थन केल्याचं पाहायला मिळालं.