संभाजी भिडेंना कॉंग्रेस अन् राष्ट्रवादीने मोठे केले, पण… पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं
Prithviraj Chavan : संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत गलिच्छ वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता ते महात्मा फुले यांच्याबद्दल देखील बोलले आहेत. त्यावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यावर आता कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडे यांच्या वादग्रस्त व्यक्तव्याप्रकरणी चव्हाण यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा ईमेल आला होता. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, संभाजी भिडे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने मोठे केले आहे. पण आता या व्यक्तीच्या भूमिकेमुळे त्यांच्यावर कारवाई केली जावी. ( Congress NCP support Sambhaji Bhide but take action on says him Prithviraj Chavan )
Maharashtra Politics : ठरलं तर! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार
सुरूवातीला भाजपच नाही तर संभाजी भिडे यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील समर्थन दिलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाण तुमच्या कराड, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना पाठबळ दिलं. बहुजन समाजाची अनेक मुल त्यांच्या संघटनेमध्ये काम करतात. तर या लोकांनी भिडेंना पार्श्वभूमी नपाहता पाठिंबा दिल्याने आज ही परिस्थिती आली आहे का? असा प्रश्न विचारला असता पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, त्यावेली काय घडलं मला माहिती नाही. पण भिडेंची आताची भूमिका सुरूवातीला नव्हती. सुरूवातीला त्यांनी गड-किल्ल्यांची स्वच्छता असे कार्यक्रम हाती घेतल्याने तत्कालीन त्यांना समर्थन करणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला नाही.
‘Baipan Bhari Deva’ने दिली हॉलिवूड सिनेमाला टक्कर, ३० दिवसात कमावले ‘इतके’ कोटी
पुढे चव्हाण म्हणाले की, तसेच ते इतिहास तरूणांपर्यंत पोहचवत होते. त्यामुळे त्यांना समर्थन मिळालं पण आजच्या घडीला हा व्यक्ती कसा वागतो? किंवा त्यांची काय भूमिका आहे? समाजामध्ये त्यामुळे धर्मिक तेढ निर्माण होत आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी यावेळी चव्हाण यांनी केली. ते मुंबई तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान इतरवेळी संयमात दिसणारे पृथ्वीराज चव्हाण दोन दिवसांपूर्वी विधानसभेत चांगलेच आक्रमक झाले होते. संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना अटक करण्याची मागणी चव्हाण यांनी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली. या प्रकरानंतर चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानाची सुरक्षा वाढविण्यात आली. तसंच कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाही सुरु करण्यात आली.