Maharashtra Politics : ठरलं तर! विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर विरोधकांचे विरोधी पक्षनेतेपद रिक्त होते. राष्ट्रवादी फूट पडल्यामुळे पक्षाच्या आमदारांची संख्या घटली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त झाल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. त्यानंतर आज अपेक्षेप्रमाणे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने हा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीत अजितदादा कुणाचा प्रचार करणार? भुजबळांनी दिलं भाजपला टोचणारं उत्तर
मागील जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात मोठे बंड घडवले. अजितदादासंह 8 आमदारांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार गटाने पक्षावरच दावा ठोकला. या घडामोडीत पक्षाला मोठा दणका बसला. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटली. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष वरचढ ठरला. राष्ट्रवादीकडील विरोधी पक्षनेते पदही गेलं.
थोरात-चव्हाण-पटोलेंनी किल्ला लढवला
आमदारांची संख्या जास्त असल्याने काँग्रेसचाच विरोधी पक्षनेता होईल हे निश्चित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही तसाच दावा करत होते. पण, काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून कोणाला संधी द्यायची असा प्रश्न होता. काँग्रेसच्या नेहमीच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा फटका याहीवेळी बसला. अंतर्गत गटबाजीमुळे विरोधी पक्षनेत्याचे नाव निश्चित होत नव्हते. विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले तरी हा गोंधळ कायम होता. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याविनाच विरोधी पक्ष अधिवेशनाला सामोरा गेला. अधिवेशनात काळात काँग्रेस नेते मात्र कमालीचे आक्रमक दिसले. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नाना पटोले या ज्येष्ठ नेते मंडळींनी विरोधकांचा आवाज कायम ठेवला.
क्रेन कोसळून समृद्धी महामार्गावर मोठा अपघात; किमान 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
कोण आहेत विजय वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे आमदार आहेत. ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वडेट्टीवार यांच्याकडे मदत पुनर्वसन, खार जमिनी विकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण या विभागांची जबाबदारी होती.