Download App

महाविकास आघाडीच्या बैठकीत काय खलबतं? नाना पटोलेंनी थेट सांगितलं

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये 16 जागांचा फॉर्मुला ठरला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. दरम्यान, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगलंच यश आल्याने आता भाजपविरोधात मोट बांधलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांचा विश्वास वाढल्याचं दिसून येतंय.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ‘त्या’ घटनेप्रकरणी गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

अशातच काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटबाबत एक मोठं विधान केलंय. कर्नाटक निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये झालेल्या बैठकीत जागावाटपासंदर्भातप प्राथमिक चर्चा झाली असून अद्याप जागावाटपावर कोणताही निर्णय झालेला. फक्त प्राथमिक चर्चा झाली असून जागावाटपाचा मुद्दा अद्याप पुढे गेला नसल्याचं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

Prashant Damle: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले

नूकत्याच झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली होती. विशेषत: ठाकरे गटाचे उद्धव ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसाठी 16 जागांचा फॉर्मुला ठरल्याची चर्चा सुरु आहे पण अद्याप या माहितीला कुठल्याही नेत्याने दुजोरा दिलेला नाही.

IPL 2023 : 3 जागा, 8 मॅच, 7 संघ; कोण गाठणार प्लेऑफ, समजून घ्या गणित

दरम्यान, देशात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत अस्मान दाखवण्यासाठी देशभरातील विरोध पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे. नूकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 135 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

https://www.youtube.com/watch?v=VdbU2GagpB0

भाजपला सत्तेतून खाली खेचत काँग्रेसने 135 जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. त्यामुळे आता हाच पॅटर्न सर्वच राज्यात लागू करण्याची रणनीती असल्याचं दिसून येतंय.

Tags

follow us