सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा दबदबा; जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या 25 जागा बिनविरोध जिंकल्या

महायुतीला मोठं यश मिळालं असून जिल्हा परिषदेतल्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

Untitled Design 7

Untitled Design 7

Mahayuti’s dominance in Sindhudurg district : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं असून जिल्हा परिषदेतल्या 8, तर पंचायत समितीच्या 17 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. 50 सदस्यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे 7 आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध निवडून आला आहे. त्याचप्रमाणे, 100 सदस्यसंख्या असलेल्या पंचायत समित्यांमध्ये भाजपचे 16 आणि शिंदे शिवसेनेचा 1 सदस्य बिनविरोध विजयी झाला आहे.

दरम्यान, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतूनही शिवसेनेचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. रायगडमधील महाड पंचायत समितीच्या सवाने-धामणे गणातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार अनिल जाधव यांच्या विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या दिवशी माघार घेतल्याने ते बिनविरोध निवडून आले. तर रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेच्या डॉ. पद्मजा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे बिनविरोध विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

जिल्हा परिषद (8 जागा):
खारेपाटण – प्राची इस्वालकर (भाजप)
बांदा – प्रमोद कामत (भाजप)
जाणवली – रुहिता राजेश तांबे (शिवसेना – भाजप समर्थित)
पडेल – सुयोगी रविंद्र घाडी (भाजप)
बापर्डे – अवनी अमोल तेली (भाजप)
पोंगुर्ले – अनुराधा महेश नारकर (भाजप)
किंजवडे-सावी – गंगाराम लोके (भाजप)
कोळपे – प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप)

12 जिल्हे, 125 पंचायत समित्या आणि एकचं प्रश्न, सत्ता कोणाची, दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

पंचायत समिती कणकवली (6 जागा):
वरवडे – सोनू सावंत
नांदगाव – हर्षदा हनुमंत वाळके
जाणवली – महेश्वरी महेश चव्हाण
बिडवाडी – संजना संतोष राणे
हरकुळ बुद्रुक – दिव्या दिनकर पेडणेकर
नाटळ – सायली संजय कृपाळ
(सर्व भाजप)

देवगड पंचायत समिती (6 जागा):
पडेल – अंकुश यशवंत ठूकरूल
नाडण – गणेश सदाशिव राणे
बापर्डे – संजना संजय लाड
फणसगाव – समृद्धी संतोष चव्हाण
शिरगाव – शितल सुरेश तावडे
कोटकामते – ऋतुजा राकेश खाजनवाडकर
(सर्व भाजप)

इतर पंचायत समित्या:
वैभववाडी – कोकिसरे साधना सुधीर नकाशे (भाजप)
वेंगुर्ले – आसोली संकेत धुरी (भाजप)
मालवण – अडवली मालडी सीमा सतीश परुळेकर (भाजप)
सावंतवाडी – शेरले महेश धुरी (भाजप)
दोडामार्ग – कोलझर गणेश प्रसाद गवस (शिंदे शिवसेना)

या बिनविरोध विजयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचं स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्व अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Exit mobile version