Download App

आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही! शिंदे गटाच्या आमदाराला विश्वास…

Mahesh Shinde : शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्नच नाही कारण जे झालंय ते कायद्याला धरुन झालंय, त्यामुळे विधानसभेचे अध्यक्ष विचार करुनच निर्णय देणार असल्याचा विश्वास आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोरेगावमध्ये आयोजित भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर आमदार महेश शिंदे(Mahesh Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

Ajit Pawar : ‘पुढं अर्थखातं माझ्याकडे टिकेल की नाही..?’; अजित पवार असं का म्हणाले?

महेश शिंदे म्हणाले, ज्यांना वाटतं की, आमदार अपात्र होतील त्यांनी एकदा ग्रामपंचायत निवडणूक लढवावी, 20 वर्ष झालं आत्तापर्यंत साधा सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यदेखील अपात्र झालेला नाही, हे तर आमदार आहेत, ते किती हुशार असतील. मग लक्षात घ्या. सदस्य अपात्र झालाच तर तो तब्बल सहा वर्षाने होतो, तोवर त्याची मूळ मुदत संपलेली असते. आमच्या खातगुण ग्रामपंचायतीचा सरपंच अनिल साठे हा पहिल्याच वर्षी अपात्र ठरला. आम्ही उच्च न्यायालयातून स्थगिती घेतली. प्रत्यक्ष निकाल तब्बल सहा वर्षाने आला, असल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

Chandrashekhwar Bawankule : ‘2024 नंतर विरोधकांकडे विरोधी पक्षनेताच राहणार नाही’…

तसेच आमदार अपात्र होणार म्हणणाऱ्यांनी एकदा ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी, सदस्य अथवा सरपंच अपात्र करण्याचे प्रयत्न करावेत म्हणजे कळेल की ते किती अवघड असते. अहो पाच वर्षात कधीही सदस्य अपात्र झाला नाही. माझ्या २० वर्षाच्या कारकिर्दीत आम्ही एकही सदस्य अपात्र करू शकलो नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘आज माझ्याकडं अर्थखातं, पुढं टिकेल सांगता येत नाही’; अजितदादांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट !

शशिकांत शिंदेंवर उपरोधिक टीका :
शशिकांत शिंदे यांची जन्मभूमी ही जावळी असूनही शिंदे यांचा कोरेगावकरांनी स्वीकार केला आहे. एवढंच नाहीतर त्यांना निवडूनही दिले. जावळीत ते सहज गेले असतील अथवा त्यांना आता कोरेगावात काही अडचण वाटत असेल, तसेच स्वागत सर्वांचेच होत असते. मात्र, ते जावळीत जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा.! असल्याचं महेश शिंदे म्हणाले आहेत.

Tags

follow us