मुंबई : अखेर राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमा समद्रातल्या मजारभोवतालचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सहा अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाच्या निगराणीखाली मजारीचे अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे.
राज ठाकरेंचा एक इशारा अन् साफ माहीम किनारा…
गुढीपाडव्याच्या सभेत राज ठाकरेंनी माहीमा समुद्रातल्या अनधिकृत बांधकामाचा व्हिडिओच दाखवला होता. त्यानंतर एक महिन्यात हे अतिक्रमण पाडण्याचा इशारा प्रशासनाला दिला. सभेनंतर काही कार्यकर्ते या मजार परिसरांत पोहचले होते. मात्र, पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेने घटना टळली. अखेर आज सकाळीच सुर्याची पहिली किरण पडताच महापालिकेचे पथक जेसीबी आणि बुलडोझरच्या साहाय्याने माहीमा समुद्र परिसरात दाखल झालं होतं.
कागदोपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित मजार जुनी आणि नोंदणीकृत असल्याचं स्पष्ट झाल्याने मजार पाडण्यात येणार नसल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आलीय. मात्र मजारभोवतालच्या अनधिकृत बांधकामांवर महापालिकेने हातोडा मारला आहे.
नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती पण, बाळासाहेबांनी..; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग !
कालच्या व्हिडिओमध्ये झेंडा आणि इतर जे बांधकाम दिसत होतं. ते बांधकाम महापालिकेच्या पथकाने पाडलं आहे. पथकाने केलेल्या कारवाईनंतर ही जागा आता भूईसपाट झाल्याचं दिसून येत आहे.
कारवाई सुरु असताना मजारीचा प्रश्न उपस्थित झाला मात्र, ही मजार विधीवत करुन उचलण्यात आल्याचं दिसून आलं आहे. याआधी मजारभोवताली कोणत्याही प्रकारचे बांधकाम नव्हते, मात्र, मागील दोन वर्षांत मजारभोवती अनधिकृत बांधकाम केल्याचं दिसून आलं.
ऐश्वर्या रजनीकांतच्या दागिन्यांची चोरी करणं पडलं महागात; घरातल्या ‘या’ सदस्यावर गुन्हा
ज्या तत्परतेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आलीय. अर्थात राज ठाकरेंनी काल केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्यानेच केल्याचं समोर येत आहे.
दरम्यान, कारवाईच्यावेळी कोणताही अनूसुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदारी घेण्यात आली होती. पोलिसांचा मोठा फौजफाट माहीमा समुद्र परिसरांत तैनात करण्यात आला होता.
अद्याप तरी या मजारीला कोणत्याही प्रकारचा विरोध कोणी केला नसल्याची माहिती समोर आली असून पुढील काळात मजारीचे पूजारी आणि मुस्लिम बांधव कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.