Mahrashtra Politics : .. तर संजय राऊतांवरही कारवाई करा; शंभूराज देसाईंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

Maharashtra Politics : न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही.हा आमच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. ठाकरे गटाकडून या निर्णयाला स्थगिती दिली जावी अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही घडले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भडक वक्तव्ये करण्यात माहीर आहेत. त्यांना […]

Shambhuraj Desai1 202207846886_202212452886

Shambhuraj Desai1 202207846886_202212452886

Maharashtra Politics : न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही.हा आमच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. ठाकरे गटाकडून या निर्णयाला स्थगिती दिली जावी अशी मागणी केली जात होती. मात्र, तसे काही घडले नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, की ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भडक वक्तव्ये करण्यात माहीर आहेत. त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली. या प्रकरणात ते श्रीकांत शिंदे यांची बदनामी करत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आम्ही सुद्धा केली आहे. चौकशीनंतर जर असे काही आढळून आले नाही तर संजय राऊत यांच्यावर कायदेशीर करावी, अशीही मागणी आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. संजय राऊत ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत तर त्यांनी त्यांच्याबद्दल बोलावे. मात्र, ते राष्ट्रवादीचेच प्रवक्ते असल्याचे दिसत आहे.त्यामुळे त्यांनी यावर आधी स्पष्टीकरण द्यावे असे देसाई म्हणाले.

हे वाचा : Maharashtra Politics : ‘भाजपसह शिंदे गटालाही अजित पवारांचे खोचक टोले ; म्हणाले…

पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, की शपथविधीबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचे पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आज अचानक सात महिन्यांनी त्यांनी आता केलेल्या वक्तव्यावरून असे दिसत आहे की याबाबत पवार यांना आधीच माहिती होते असे दिसते. शरद पवार यांचे दुटप्पी धोरणही यावरून दिसून येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.

https://www.youtube.com/watch?v=jHKT6uhj2_A

Exit mobile version