Malegaon Sugar Factory Election : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर (Malegaon Sugar Factory Election) झालाय. ‘ब’ प्रवर्गातील मतमोजणी अखेर संपली आहे. ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजित पवार यांना (Ajit Pawar) 91 तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला दहा मते पडले आहेत. ब प्रवर्गातून अजित पवारांना तब्बल 91 मते मिळाली. तर सहकार बचाव पॅनलच्या भालचंद्र देवकाते यांना केवळ 10 मते मिळाली आहेत.
माळेगावसाठी चौरंगी लढत
अजितदादांनी माळेगावची निवडणूक सोपी जावी, यासाठी खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंपरागत विरोधक चंद्रराव तावरे यांना चेअरमनपदाची ऑफर दिली. पण कसलेले खेळाडू तावरे यांनी ऑफर नाकारली. त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीसाठी चार पॅनल आमने-सामने आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली श्री निळकंठेश्वर पॅनल, (Maharashtra Politics) शरदचंद्र पवार पक्षाचा बळीराजा शेतकरी पॅनल , चंद्रराव तावरे यांच्या नेतृत्वाखाली सहकार बचाव शेतकरी पॅनल आहे. शेतकरी बचाव समितीचे एक पॅनल अशा चार पॅनलमध्ये चौरंगी लढत होतेय. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका कारखान्यासाठी ताकदपणाला लावलीय. आता मतदार अजितदादांना स्वीकारते की सत्ता बदल करते हे आज मतमोजणीत स्पष्ट होईल.
हिंदी भाषा धोरणावर मनसे प्रमुख राज ठाकरेंशी बोलणार का?, मंत्री दादा भुसे यांनी काय दिलं उत्तर?
चंद्रराव तावरे अन् अजितदादांचा संघर्ष
आतापर्यंत हा कारखाना अजितदादांच्या ताब्यात राहिलेला आहे. 1991 पासून 2025 पर्यंत तब्बल 35 वर्षांच्या कार्यकाळात 25 वर्ष हा कारखाना अजितदादांकडेच आहे. अजितदादा राजकारणात सक्रीय झाल्यानंतर शरद पवार यांचे जुने मित्र चंद्रराव तावरे यांना त्यांनी माळेगावपासून दूर केले. तेथूनच अजित पवार विरुद्ध चंद्रराव तावरे असा संघर्ष सुरू झाला. आतापर्यंत चंद्रराव तावरे यांनी दोन वेळेस अजितदादांचा पॅनेल पराभूत करत दोनवेळा कारखाना आपल्या ताब्यात घेतलाय. आता मात्र अजितदादांना पाहायचे आहे ग्राउंडला आपली ताकद किती आहे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात पाच वर्षांत नऊ हजार कोटींचा कामे केलीत. मी विकासकामे करत असताना विरोधकांना मते का मिळतात हेच पाहायचे आहे, असे अजितदादा जाहीरपणे सांगतायत.
मोठी बातमी! इराण अन् इस्रायलमध्ये युद्धबंदी; अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
बारामतीचा बॉस कोण?
माळेगाव कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले. या कारखान्याचे मतदार आहेत 19 हजार 549 इतकी. पण अजितदादांनी मतदान होऊपर्यंत माळेगावच्या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तळ ठोकला होता. ते कारखान्यांच्या सभासदांना घरोघरी जावून भेटत होते. अजितदादांनी ही निवडणूक गांभीर्याने का घेतली? त्याला अनेक कारणे आहेत. त्यात शरद पवार यांची साथ नसतानाही माळेगावची निवडणूक अजितदादांना जिंकून दाखवयाची. एकत्र निवडणूक लढण्याची ऑफर सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना दिली होती. त्यासाठी त्यांनी अजितदादांना फोनही केला होता. परंतु त्यांनी तो घेतलाय नाही, अशी राजकीय चर्चा आहे.